अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनाला पकडले
दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- मोहाडी तालुक्यातील करडी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या देव्हाडा खुर्द पोस्ट जवळ अवैधरित्या बोलेरो पिकअप डाला क्र एम.एच.-३५-के३४४७ मध्ये चालक बादल शिवाजी बोंदरे (वय २४) रा. नरसिंह टोला ता. मोहाडी जि. भंडारा व रंजित ताराचंद कुकडे रा. केसलवाडा ता. तिरोडा जि. गोंदिया हे तीन पांढऱ्या रंगाचे व एक लाल रंगाची असे मिळुन चार बैल अंदाजी किंमत ८०००० हजार रुपये व पिकअप डाला पोलीस स्टेशन मध्ये जप्त करून आरोपी वर फिर्यादी निखील रंजीत कोचे यांच्या तक्रारीवरून अप क्र २६३/ २०२५ कलम ११(१) घ च ज ड प्राण्यांना कुरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० सहकलम ५ (अ)(२)९ महा पशु संरक्षण अधि .१९७६ सहकलम ४९ भा न्या संहीता कार्यवाही करण्यात आली यावेळी ठाणेदार गोरक्षनाथ नागलोथ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनुमंत फरताडे करीत आहेत.









