अभिषेक कारेमोरेच करणार शहराचा कायापालट!

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर ः- तुमसर नगरपरिषदेच्या निवडणुकीला अवघे काही दिवस उरले असून संपूर्ण शहरात राजकीय तापमान चढले आहे. सर्वच पक्षांचे उमेदवार आणि त्यांचे समर्थक घराघरात जाऊन मतदारांना भेटत आहेत.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार इंजिनीयर अभिषेक कारेमोरे यांच्या बाजूने शहरात मजबूत लाट असल्याचे स्पष्ट चित्र उमटू लागले आहे. मतदारांचा असा विश्वास निर्माण झाला आहे की, तुमसरचा खरा कायापालट करण्याची क्षमता फक्त अभिषेक कारेमोरे यांच्यातच आहे. गेल्या काही वर्षांत शहरातील प्रलंबित प्रश्न, वाढत्या नागरी समस्या आणि विकासकामांचा अभाव लक्षात घेता नागरिक अभिषेक कारेमोरे यांनाच सक्षम पर्याय मानत असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, अभिषेक कारेमोरे यांच्या विजयासाठी आमदार राजू कारेमोरे स्वतः रणांगणात उतरले आहेत. बुधवारी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शहरातील सर्व प्रभागात नुक्कड सभा घेऊन अभिषेक कारेमोरे तसेच इतर २५ नगरसेवक उमेदवारांच्या समर्थनार्थ प्रचाराचा धडाका लावला. या सभांमध्ये खासदार पटेल यांनी आश्वासन दिले की, राज्य व केंद्र सरकारकडून निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. तुमसरला विकसित शहरांच्या यादीत उभे करण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल. महिलांच्या समस्यांवर विशेष लक्ष देण्याचा निर्धार अभिषेक कारेमोरे यांनी यावेळी व्यक्त केला. शहरातील “लाडक्या बहिणींच्या आशिर्वादामुळेच हा बदल शक्य होईल,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपक्रम राबविण्याची ग्वाही त्यांनी दिल्याने महिला मतदारांमध्ये उत्सुकता वाढली आहे. २ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर तुमसरची राजकीय हवा जोर धरू लागली असून, विकासाचा ध्यास आणि समस्यांच्या निराकरणाची हमी देणारे अभिषेक कारेमोरे हे नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे राजकीय वतुर्ळात बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *