निलेश राणेंचं स्टिंग ऑपरेनशन, भाजपवर गंभीर आरोप; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, अशा पद्धतीने व्हिडिओ शूट करणं निश्चितच नियमबाह्य

मुंबई:- निवडणुकीच्या काळात कुठेही पैसे सापडले तर निवडणूक आयोग त्यासंदर्भात कारवाई करते. पोलिसांनाही त्या संदर्भात हस्तक्षेप करून आवश्यक ती कारवाई करावी लागते. या घटनेत घरात पैसे सापडले आहे, बेडरूममध्ये पैसे ठेवलेले दिसत आहे. ते त्यांच्या जमिनीच्या व्यवहारातून आले का, कि अन्य कोणत्या व्यवहारातून आले? कोणत्या कारणासाठी ते पैसे आहे, याची चौकशी करणे आवश्यक आहे. निवडणुकीच्या काळात पैसे वाटताना कोणी पकडले गेले, तर निवडणूक आयोग तत्काळ कारवाई करतो, परंतु हे पैसे घरी सापडले असल्याने याची चौकशी करणे आवश्यक आहे.

या प्रकरणात जे काही सत्य असेल, त्याची चौकशी झाली पाहिजे. चुकीचे पैसे असतील, तर कारवाई होणं आवश्यक आहे. चुकीचे व्यवहार असतील तर पोलिसांकडून आणि निवडणूक आयोगाकडूनही कारवाई केली जाईल. अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीय. त्यांच्या घरात पैसे का होते, कुठून आणले, कोणत्या व्यवहारातून आणले. हे सर्व तपासणे आवश्यक आहे. मात्र२७ नोव्हेंबर रोजी असं म्हणणं की भाजप कार्यकर्त्याच्या घरात पैसे सापडले आणि एखाद्याच्या घरात थेट जाऊन बेडरूमपर्यंत स्टिंग ऑपरेशन करणे, हे योग्य नसल्याचीही प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *