भंडाऱ्यात मतांचे विभाजन निर्णायक ठरणार; चौकोनी लढत
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- जिल्हा मुख्यालय असलेल्या भंडारा नगरपरिषद निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. येत्या २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून, विधानसभा निवडणुकीनंतर महायुती आणि महाविकास आघाडीचे घटक पक्ष यावेळी ही निवडणूक स्वतंत्रपणे लढवत असल्याने लढत रंगतदार होणार आहे.
या निवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री बोरकर, भाजपच्या मधुरा मदनकर, शिंदे शिवसेनेच्या डॉ.अश्विनी भोंडेकर, आणि राष्ट्रवादीच्या (अजित गट) सुषमा साखरकर या प्रमुख पक्षाच्या महिला उमेदवार रिंगणात आहेत. नगराध्यक्षपद महिला खुला प्रवर्गासाठी राखीव असल्याने, शहराला दीर्घकाळानंतर महिला नगराध्यक्षा मिळणार आहे.









