शालेय नेटबॉल क्रीडा स्पर्धेत नूतन कन्या शाळा चॅम्पियन
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गोंदिया यांच्या संयुक्त विद्येमाने आयोजित नेटबॉल क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल गोंदिया येथे दि.१९ ते २१नोव्हेंबर २०२५ ला राज्य स्तर शालेय १९ वर्षाखालील मुलींच्या नेटबॉल क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत नूतन कन्या शाळा तथा कानिष्ठ महाविद्यालय भंडारा संघाने प्रथम क्रमांक प्राप्त करून महाराष्ट्र नंबर चा मान प्राप्त केला. कर्नाटक बेंगलोर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धे कारिता तनुश्री करंडे, श्रेया बाभरे महाराष्ट्र नेटबॉल संघात निवड झाली.
दोन्ही महाराष्ट्र संघांचे प्रतिनिधित्व करणार संघाला -क्रीडा शिक्षक बेनीलाल चौधरी, शुभांगी येणोरकर, अंकित भगत यांचे प्रशिक्षण लाभले. संघातर्फे -धनिष्का कावळे, माही पाऊल झगडे, रेणुका मते, प्रिंसू उपरीकर, लिना पदाम, तनुश्री करंडे, श्रेया बाभरे, मानसी घोती, शाम्भवी कोहळे, अपूर्वा भेलावे, सुमैया चौहान, जान्हवी बावनकुळे यांनी उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन केले. संघाच्या विजयाबद्दल संस्थेचे अध्यक्ष एडव्होकेट एम.एल.भुरे, संस्थेचे सचिव शेखर बोरसे, प्राचार्या सौ. निलू तिडके, उपमुख्याध्यापक कैलास कुरंजेकर, पर्यवेक्षिका श्रद्धा रामेकर, लता ब्राह्मणकर, रेखा पनके, मोहन दाढी, अरुण बांडेबूचे, क्रीडा अधिकारी आकाश गायकवाड, श्याम देशमुख जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाडे यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.









