रेवाबेन मनोहरभाई पटेल महिला कला महाविद्यालययात संविधान दिन साजरा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- स्थानिक रेवाबेन मनोहरभाई पटेल महिला कला महाविद्यालययात संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. रा. से यो विभाग आणि ग्रंथालय विभाग द्वारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंजना शृंगारपुरे अध्यक्ष स्थानी होते तर प्रमुख मार्गदर्शक संगीत विभाग प्रमुख डॉ. राहुल भोरे, ग्रंथपाल वर्षा मेश्राम, डॉ. कैलास ईश्वरकर व्यासपिठावर उपस्थित होते. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला माल्यर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. ईश्वरकर यांनी केले.

डॉ. शृंगारपुरे आपल्या अध्यक्ष भाषनात म्हणाले की संविधान आपल्या देशाचा आत्मा आहे. भारताची राज्यघटना जगातील सर्वोत्तम उत्कृष्ट राज्य घटना आहे. आपली मूलभूत अधिकार हे सर्वात उत्कृष्ट आहे. समता. न्याय. बंधूता. यांचा आपल्या जीवना प्रत्येकाने अंगीकृत करावे असे म्हणाले तर डॉ. राहुल भोरे यांनी संविधान प्रास्ताविक वाचन केले. डॉ. भोरे मार्गदर्शनात म्हणाले प्रत्येक व्यक्तीला आपल्या राज्य घटनेने. सामाजिक, आर्थिक, व राजनैतिक न्याय. विचार. अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची समानता व संधीचीं समानता आपल्याला राज्यघटनेने दिले आहे.

प्रत्येक व्यक्तीला मूलभूत अधिकार दिले आहे. त्यामुळे आपल्यालां समाजात प्रतिष्ठित दर्जा मिळाला आहे. त्यांनी संविधान प्रस्ताविका विध्यार्थीना समजावून सांगितले. तर ग्रंथपाल वर्षा मेश्राम म्हणाले की संविधान प्रास्ताविका मधील प्रत्येक शब्द आपल्या जीवनात अंगीकर करा व व्यक्तीची प्रतिष्ठाआणि बंधूता यांचे पालन करा तरच आपले जीवन सार्थक होईल. कार्यक्रमाला महाविद्यालय मधील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष अधिकारी डॉ. चंद्रशेखर शर्मा, हिंदी विभाग प्रमुख डॉ. सुषमा नरंजे, डॉ. श्वेता वेगड उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *