तुमसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिषेक कारेमोरे यांना वाढता जनसमर्थन!

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- तुमसर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात आता मतदार खुल्या मनाने चर्चा करताना दिसत असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष इंजिनीयर अभिषेक कारेमोरे यांचे नाव पुन्हा एकदा जोमाने पुढे येत आहे. गेल्या वीस वर्षांत त्यांनी केलेल्या विकासकामांची ठोस छाप आजही मतदारांच्या मनात असल्यामुळे शहरातील प्रत्येक वॉर्डातून त्यांना वाढता जनसमर्थन मिळताना दिसत आहे.

शहराचा चेहरामोहरा बदलणाऱ्या अभिषेक कारेमोरे यांच्या अडीच वर्षांच्या कारकीर्दीत अनेक विक्रमी कामे उभी राहिली. तुमसरच्या विकासासाठी सक्षम नेतृत्व म्हणून अभिषेक कारेमोरे हेच योग्य उमेदवार असल्याची चर्चा शहरात जोमात सुरू आहे. तुमसरला हागणदारीमुक्त शहराचा दोन कोटींचा पुरस्कार अभिषेक कारेमोरे यांच्या नेतृत्वाखाली तुमसर शहराने हागणदारीमुक्त शहराचा महाराष्ट्रातील पहिला दोन कोटी रुपयांचा पुरस्कार पटकावला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा सत्कार करत त्यांच्या कामाचा गौरव केला होता. शहरात तब्बल ११०० शौचालयांचे बांधकाम हा जनजीवनाशी निगडित असलेला मोठा टप्पा त्यांनी पूर्ण केला. मुंबईपूर्वी तुमसरात लावले देखणे एलईडी लाईट; २६०० दिवे तीन दिवसांत!

तुमसरच्या विकासकथेतील सर्वाधिक चर्चेचे पान म्हणजे एलईडी लाईट प्रकल्प. मुंबईत एलईडी लागण्यापूर्वीच तुमसर शहर उजळले होते हे विशेष. फक्त तीन दिवसांत २६०० एलईडी लाईट बसविण्याचा विक्रम कारेमोरे यांनी केला. यामुळे तुमसरची संपूर्ण ओळच पालटली. रात्रीच्या सुरक्षिततेमध्ये आणि सौंदर्यात लक्षणीय वाढ झाली. नगरपरिषदेच्या १६ पैकी फक्त ४-५ शाळा उरल्याचीस्थिती पाहून कारेमोरे यांनी शिक्षण व्यवस्थेवर विशेष लक्ष केंद्रित केले होते. विद्यार्थ्यांच्या सुविधा, शैक्षणिक वातावरण याकरिता त्यांनी अनेक सुधारणा राबवल्या. तुमसरमध्ये नागरिकांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी३८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. तसेच नगरपरिषदेकडे स्वतंत्र सुरक्षा दले तयार करून शहरातील सुरक्षिततेला नवे रूप दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *