विकासाचा झंझावत सुरु ठेवण्यासाठी नगरपरिषदेत भगवा फडकवा
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा विकासाचा झंझावत सुरु आहे. हा विकासाचा झंझावत सुरु राहण्यासाठी भंडारा, तुमसर, साकोली व पवनी नगरपरिषदेवर भगवा फडकवा. नगर विकास खाते शिवसेनेकडे आहे, त्यामुळे मी शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. लाडक्या बहिणींची ताकद ज्यांच्याकडे आहे, त्यांचा विजय नक्कीच आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. दसरा मैदान येथे भंडारा, तुमसर, साकोली व पवनी नगरपरिषदेतील उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत बोलतांना त्यांनी वरील आवाहन केले.
यावेळी मंचावर मंत्री आशिष जयस्वाल, आ. नरेंद्र भोंडेकर, भंडारा नगराध्यक्ष पदाच्याउमेदवार डॉ. सौ. अश्विनी नरेंद्र भोंडेकर, तुमसर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कल्याणी भुरे, साकोली नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार वंदना गुलाब पोहणे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व नगरसेवक पदाचे उमेदवार होते. एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, नरेंद्र भोंडेकर यांनी भंडारा विधानसभा मतदार संघाच्या विकासासठी तीन हजार कोटी रुपये आणले आहे. आमचा फोकस विकासाचा आहे. आम्ही कामाने उत्तर देतो. टिकेकडे लक्ष देत नाही.
हा विकासाचा झंझावत सुरु ठेवण्यासाठी शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मी माझे आईचे दुःख पाहिलो, पत्नीचे दुःख पाहिलो. माझ्या बहिणंींचे दुःख बघितलो. त्यासाठी मी माझ्या बहिणींसाठी लाडकी बहिण योजना सुरु केली. मात्र लाडकी बहिणींना मिळणारा लाभ कोणीही थांबवू शकले नाहीत. विधानसभेत शिवसेनेने ८० जागा लढल्या. त्यापैकी ६० जागा जिंकवून दिल्या. मुख्यमंत्रीअसतांनाही कॉमन मॅन होतो. आज मी उपमुख्यमंत्री असलो तरी मी कॉमन मॅन म्हणून काम करीत आहे. मी सर्वसामान्य कुटुंबातला आहे. शेतकऱ्यांचा मुलगा आहे. संघर्षमय जीवन जगूनही मी सतत काम करीत राहिलो व पुढेही राहणार आहे. ग्रामिण भागातील बचत गटांना जसे अनुदान मिळतो तसा लाभ शहरी भागातील बचत गटांनाही अनुदान देणार आहोत. प्रकल्पग्रस्तांना पट्टे दिले.
धानाचा बोनस वाढविला. केंद्राप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सन्मान योजना सुरु केलो. आपण जे काम केलो ते लोकांच्या हितासाठी केलो. ३२ हजार कोटीचे पॅकेज जाहिर केलोत. कर्जमाफीचा वादा पूर्ण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. जलपर्यटनातून १५ हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. आमदार भोंडेकर यांनी आजपर्यंत ज्यांना शक्य झाले नाही, तेवढे काम केले. लोकप्रतिनिधी कसा असावा तर नरेंद्र भोंडेकर यांच्या सारखा असावा. नरेंद्र भोंडेकर यांच्या यशामागे डॉ. अश्विनीताई आहेत. त्यांचा विकासाचा झंझावत सतत सुरु ठेवायचा असेल तर अश्विनीताई यांना निवडून द्या. कोरोनामध्ये सुद्धा डॉ. अश्विनी यांना कोरोना योद्धा म्हणून पुरस्कार मिळाला आहे. येत्या २ डिसेंबर रोजी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाचे बटन दावा व विकास प्रवृत्ती विरोधकांना ठेचून काढा, असेही एकनाथ शेंदे म्हणाले. यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी भंडारा शहरासाठी व विधानसभा क्षेत्रासाठी केलेल्या कामाचा आढावा मांडला. विकासात्मक कामे करण्यासाठी शिवसेनेच्या पाठिशी रहा व शिवसेना उमेदवारांना निवडून द्या, असेही आवाहन त्यांनी केले.









