सामान्य रुग्णालयात तिसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याने रुग्णाचा जागीच मृत्यू

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथील तिसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याने रुग्णाचा मृत्यू झाला. अखिलेश भिकराम मरसकोल्हे (वय २२) रा. कुडवा, पो. गोरेघाट, ता. तिरोडी, जि. बालाघाट असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणामुळे सामान्य रुग्णालय प्रशासनावर तोषेरे ओढले जात आहे. रुग्ण वर कसा गेला हा प्रश्नच आहे. सविस्तर असे की, अखिलेश मरसकोल्हे याला सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे भरती करण्यात आले होते. दि. २३ नोव्हेंबर रोजी त्याला सामान्य रुग्णालय भंडारा येथे रेफर करण्यात आले. वॉर्ड क्र. १९ मध्ये भरती करण्यात आले होते.

दि. २४ नोव्हेंबर रोजी दुपारी २.०० वाजताच्या दरम्यान तो सामान्य रुग्णालय इमारतीच्या सर्वात वरच्या स्लॅबवर गेला. स्लॅबरला पकडून तो काही वेळ लोंबकळत राहिला. त्यावेळी त्याला सुरक्षा रक्षक व इतर अनेकांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्याने ऐकले नाही व खाली उडी मारले. खाली पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला.पोलीस स्टेशन भंडारा येथे मर्ग नोंद करण्यात आला आहे. तपास हवालदार गभने करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *