भंडारा बस स्थानक येथे “स्वच्छ, सुंदर मोहीम’ अंतर्गत सर्वेक्षण
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा बस स्थानक येथे बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक या मोहीमे अंतर्गत नुकतेच तृतीय सर्वेक्षण करण्यात आले, तिसऱ्या सर्वेक्षण दरम्यान पलंगे (उपमहाव्यवस्थापक/प्रदेश) अमरावती आणि त्यांचे सोबत मो. सईद शेख (मुख्य पत्रकार) काशिनाथ ढोमणे (पत्रकार) व प्रवासी मित्र म्हणून सुशील शेंडे समिती मध्ये हजर होते.
सोबतच यंत्र अभियंता संदिप खवडे, शीतल शिरसाठ( विभागीय वाहतूक अधिकारी), राकेश तलमले (विभागीय सांख्यिकी अधिकारी), प्रवीण गोल्हर(विभागीय अधीक्षक (अप), रा. प. म. भंडारा, सारिका लिमजे (आगार व्यवस्थापक) भंडारा ई. या प्रसंगी उपस्थित होते. रांगोळी व शोभिवंत झाडे ठेवून बस स्थानकाची शोभा वाढविण्यात आली. बस स्थानक कार्यालय येथे मान्यवरांचे फुलझाडे देवून स्वागत करण्यात आले.









