मोहाडीच्या चार अग्निवीरांचा सत्कार
दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- मोहाडी तालुक्यातील चार युवकाची निवड आर्मी अग्निवीरसाठी नुकतीच करण्यात आली.त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन मोहाडी येथे करण्यात आले होते. तुळशीराम तितीरमारे औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोहाडी येथे आयोजित या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी नगरपंचायत मोहाडीचे उपाध्यक्ष सचिन गायधने हे होते.प्रमुख अतिथी म्हणून प्रा.नरेश आंबिलकर,सुचित लिल्हारे,पत्रकार यशवंत थोटे,राजेंद्र गडपायले,नितेश अंबाडकर,धर्मेंद्र दमाहे उपस्थित होते.
आर्यन कोचिंग क्लासेसचे प्रशिक्षणार्थी पुरुषोत्तम मारबते,अनिकेत नंदनवार,निखिल जांगडे, आयुष निमजे यांची निवड कामठी येथे घेण्यात आलेल्या आर्मी अग्निवीरसाठी करण्यात आली. या चारही युवकांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.निवड झालेल्या या युवकांनी परिसरातील युवक-युवतींना नोकरीसाठी मदत करावी असे आवाहन मान्यवरांनी केले.कार्यक्रमाचे संचालन आकाश दिपटे यांनी केले तर आभार अरु धार्मिक यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बादल मेश्राम,प्राची गोखले,निशिकांत रामटेके,सुमित गोमासे यांनी अथक परिश्रम घेतले.









