पालांदूर पोलिसांची अवैध मुरूम उत्खनन करणाऱ्यावर कारवाई

दै. लोकजन वृत्तसेवा पालांदूर :- पोलिसांनी अवैध मुरूम उत्खनन करणाऱ्यांवर शनिवारी २२ नोव्हेंबर २०२५ चे रात्री १.३० ते २.४५ वा. दरम्यान कारवाई करून २ टिप्पर व १ जेसीबी यंत्रासह ५७ लाख ५० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी चार जणांवर पालांदूर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वामन नत्थुजी धारणे (वय २८) रा. वडेगाव, ता. पवनी, अजय प्रकाश मेश्राम (वय २४) रा. बामणी, ता. पवनी, सुरज हिरालाल लांजेवार (वय २५) रा. मासळ, ता. लाखांदूर, आदित्य मोहनलाल नखाते, (वय २९) रा. मासळ अशी आरोपींची नावे आहेत.

फिर्यादी यांनी सोबत असलेल्या पोलीस स्टॉपसह गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस ठाणे हद्दीतील पाचगाव (टोली) ता. लाखांदूर येथील शेत शिवारात पेट्रोलींग करीत असतायातील नमुद आरोपीतांनी त्याचेकडे कोणत्याही प्रकारचे उत्खननाबाबत रॉयल्टी व परवाना नसतांना सुध्दा एक जुना वापरता एम. एच.४०, बि. एफ. ३४३४ क्रमांकाचा टिप्पर किंमत अंदाजे २० लाख रूपये ज्यामध्ये अंदाजे ५ ब्रास गौण खनिज/मुरूम किंमत अंदाजे २५ हजार रूपये, एक जुना वापरता निळ्या/पांढऱ्या रंगाचा अशोक लेलँन्ड कंपनीचा १० चाकि टिप्पर ज्याचा गाडी एम. एच. ३६, ए. ए.२१५५ असा असुन टिप्परचे किंमत अंदाजे २० लाख रूपये ज्यामध्ये अंदाजे ५ ब्रास गौण खनिज/मुरूम किंमत अंदाजे २५ हजार रूपये, एक जुना वापरता पिवळ्या रंगाचा जे. सी. बी. रोडर मशिन किंमत अंदाजे १७ लाख रूपये असा एकूण ५७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल अवैध्यरित्या मुरुम चे उत्खनन करतांनी मिळुन आले.

आरोपी विरुद्ध फिर्यादीच्या लेखी रिपोर्ट वरुन महसूल अधिकारी तहसील कार्यालय लाखांदूर यांना माहिती देऊन पंचनामा कार्यवाही करून वरील प्रमाणे मुद्देमाल जप्त करून नमूद आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, ठाणेदार सतीश बनसोड यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. तपास पो. उप. निरी. पेंदोर करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *