भंडारा पोलीस स्टेशनचे ठाणेदारभुसारी यांना तात्काळ हटवा

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- सोशल मीडियावर पोष्ट व्हारल न करताही भंडारा येथील भाजपच्या महिला उमेदवाराच्या पतीला रात्री १.३० वाजता पोलिसांनी घरून नेवून त्याचा मोबाईल जप्ती केल्याप्रकरणी भंडारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भुसारी यांना तात्काळ निलंबीत करण्यात यावे किंवा निवडणुका होईपर्यंत भंडारा पोलीस स्टेशनमधून हटविण्यात यावे, अशी मागणी भाजपच्यावतीने आज घेण्यात आलेल्या पत्रपरिषदेतून करण्यात आली.

पोलिसांचा वापर करून भंडाऱ्यात जंगलराज सुरु करण्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. पत्रपरिषदेत भाजपाचे जिल्हाध्यक्ष आशिष गोंडाणे,जॅकी रावलानी, नितीन कारेमोरे, भगवान बावणकर, विनोद भुरे, सौ. सुषमा विनोद भुरे यांच्यासह इतर पदाधिकारी व तेली समाज पंचकमेटीचे पदाधिकारी उपस्थित होते.दि. २३ नोव्हेंबर रोजी रात्री १.३० वाजताच्या दरम्यान भंडारा येथील एपीआय खांदाळे व काही पोलीस त्यांच्या प्रभाग क्र. ७ च्या उमेदवार मनिषा भुरे यांच्या घरी गेटला कुलूप लावला असतांना गेटवरून चढून आतमध्ये गेले.

त्यांनी त्यांचे पती विनोद भुरे याला तुम्ही सोशल मीडियावर एक पोष्ट व्हायरल केली असे सांगून रात्री जबरदस्तीने पोलीस गाडीमध्ये बसवून शुक्रवारी येथील शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आणले. त्यानंतर त्याचा मोबाईल ताब्यात घेवून पोलिसांनी त्याला पुन्हा घरी सोडून दिले. हा आमच्या उमेदवारांना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. पोलिसांनी स्थानिक आमदारांच्या दबावात ही कारवाई केली आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *