९ नगराध्यक्ष आणि १०७ नगरसेवक उमेदवारांनी निवडणूक तापली

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली ः- आज शेवटच्या दिवशी साकोली नगर परिषदेत निवडणुकीचे नाव वापस घेण्याची शेवटच्या दिवस असल्यामुळे आजच्या दिवस साकोली सेंदुरवाफा भाषण साठी महत्त्वाचा होता परंतु नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीतून फक्त एकच अर्जदाराने नाव परत घेतले असून आता नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत नऊ उमेदवार आपले भाग्य आजमावित आहेत. या निवडणुकीत बंडखोर उमेदवारांच्या बंडखोरीच्या फटका प्रत्येक पक्षाला बसणार असून आज वेगवेगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी राजीनामा सत्र सुरू केले त्यामुळे आता हीनिवडणूक अधिक चुरशीची झालेली आहे.

साकोली सेंदुरवाफा नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी नऊ उमेदवार रिंगणात आहेत तर २० नगरसेवक पदासाठी १०७ उमेदवार रिंगणात आहेत. नगराध्यक्ष पदा साठी फक्त एका उमेदवाराने नामांकन अर्ज मागे घेतले तर नगरसेवक पदा मधून फक्त चार उमेदवारांनी अर्ज मागे घेतले यामुळे मागे घेण्याच्या प्रक्रियेत मनधरणी प्रक्रियेने काम केले नसल्याने बंडखोर व अपक्ष उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात असून प्रमुख पक्षांच्या उमेदवारां समोर आव्हानात्मक ठरणार असल्याचे चित्र आहे. प्रमुख पक्षातून मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली असून सर्वाधिक बंडखोरी कांॅग्रेस पक्षातून तर भाजपा, बंडखोरीच्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. शह-मात च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अप) गटाचे उमेदवार महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचे चित्र आहे.

शिवसेना वंचित बसपा आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत. नगराध्यक्ष पदासाठी अनेक अनुभवी नेते, घराणेशाहीचे प्रतिनिधी तसेच नवोदित उमेदवार एकत्र रिंगणात उतरल्यानं शहरात चर्चांना उधाण आले आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीतून विद्या रंगारी यांनी नामांकन अर्ज मागे घेतला असून आता ९ उमेदवार रिंगणात आहेत. नगरसेवक पदाच्या उमेदवारीतून ४ नामांकन अर्ज मागे घेण्यात आले असून या मध्ये निलेश घरडे, मोहनिश पठाण, नितीन तरजूले, आनिक निंबेकर यांचा समावेश आहे.

अडथळे, टिकाटिप्पणी आणि पक्षांतील अंतर्गत चर्चांना मागे टाकत अनेकांनी अंतिम क्षणी अर्ज दाखल केल्याने प्रमुख पक्ष्यांच्या उमेदवारांना धडकी भरली होती ते चित्र अद्याप कायम आहे. नगराध्यक्षपदासाठी एकूण ९ उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत यात भाजपा देवश्री मनिष कापगते, काँग्रेस सुनिता अशोक कापगते, राष्ट्रवादी काँग्रेस (अप) गट भारती मोहन लंजे, वंचित बहुजन आघाडी कोकीळा सचिन रामटेके, बसपा संगीता नित्यानंद मेश्राम, अर्चना बळीराम टेंभुरकर, शिवसेना शिंदे गट वंदना गुलाबराव पोहाणे, वर्षा नीताराम तरजुले, कांचन रंजीत रामटेके यांचा समावेश आहे. नगराध्यक्ष पदासाठी अनेक अनुभवी नेते, घराणेशाहीचे प्रतिनिधी तसेचनगरसेवक पदासाठी नवोदित उमेदवार एकत्र रिंगणात उतरल्यानं शहरात चर्चांना उधाण आले आहे. बंडखोर व अपक्ष यांची संख्या बघता निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *