बेला येथे चालत असलेल्या वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफास
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- भंडारा शहरानजीक असलेल्या बेला येथे चालत असलेल्या वेश्याव्यवसाय रॅकेटचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने पर्दाफाश केला. स्त्रियांचा देहव्यापार व मानवी तस्करी, अल्पवयीन बालकांची तस्करी रोखण्याकरीता प्रत्येक जिल्हयात अनैतीक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष स्थापित करण्यात आले आहेत.
भंडारा जिल्हयातही अनैतीक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष स्थापन करण्यात आले असुन त्याचे प्रभारी अधिकारी म्हणुन सहा. पोलीस निरीक्षक केशव पुंजरवाड यांची नियुक्ती करण्यात आलेली असुन विशेष अधिकारी म्हणुन पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर, स्थानिक गुन्हे शाखा भंडारा यांना आदेशित केले आहे. दिनांक २० नोव्हेंबर २०२५रोजी अनैतिक मानवी वाहतुक कक्ष, भंडारा यांना गोपनिय माहीती मिळाली की मौजा बेला येथे अवैध देहव्यापर चालत आहे
अशा खबरेवरुन अनैतिक मानवी वाहतुक कक्षातील अधिकारी / अंमलदार तसेच विशेष अधिकारी, पंटर असे मिळून सदर गोपनिय माहीती मिळालेल्या ठिकाणी जावुन पाहणी केली असता सदर ठिकाणी एक महीला आरोपी व चार पुरुप आरोपी मिळून आले तसेच तीन पिडीत महीला मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांची वैद्यकीय तपासणी करुन पिडीत महीलांना सखी वनस्टॉप सेंटर भंडारा येथे दाखल करुन इतर ५ आरोपी विरुध्द कलम ३, ४, ५ (१), (क) अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम, १९५६ अन्वये पोलीस स्टेशन भंडारा येथे अपराध क्रमांक १६१४/२०२५ नुसार गुन्हा नोंद करुन वेशाव्यसाय रॅकेटचा पर्दाफास करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखा,भंडारा तसेच अनैतीक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षातील पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी चालत असलेल्या वेशाव्यसाय रॅकेटचा पर्दाफास करुन उल्लेखनीय कामगीरी केली आहे, याकरीता सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे. सदरची कारवाई नूरुल हसन, पोलीस अधीक्षक भंडारा, निलेश मोरे, अपर पोलीस अधीक्षक भंडारा यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर, पो. हवा. अंकुश गाढवे, पो. ना. अंकोश पुराम, पो. शि. योगेश ढबाले, पो. शि. कौशिक गजभिये, स्थानिक गुन्हे शाखा तसेच स.पो.नि. केशव पुंजरवाड, महीला पो.हवा. अर्चना कुथे, मंजुषा घरडे, मानिक किरसान अनैतिक मानवी वाहतुक कक्ष, भंडारा यांनी केलेली आहे.









