ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांचा राजीनामा
नागपूर:- राज्यात सध्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. येत्या काही दिवसात जिल्हा परिषद पंचायत समिती आणि त्यानंतर महापालिका निवडणुका जाहीर होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची रणधुमाळी सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यासाठी त्यांनी प्रकृतीचं कारण दिलं आहे.









