नगराध्यक्षपदासाठी ४५ तर सदस्य पदासाठी ७०३ अर्ज वैध

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, पवनी आणि साकोली या चार नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेले नामांकन मोठ्या प्रमाणावर गळाले आहेत. नामांकन अर्जामध्ये असणाऱ्या त्रुट्या, एबी फॉर्म न जोडणे, प्रमाणपत्रे पुरसे नसणे आदी कारणांमुळे अनेकांचे नगरसेवक होण्याचे स्वप्न छाननीमध्येच भंगले आहे.

नगराध्यपदासाठी चारही ठिकाणी ७० नामांकन आले होते. त्यापैकी २५ अपात्र ठरल्याने ४५ अर्ज कायम आहेत. तर, नगरसेवक पदासाठी आलेल्या ९२५ नामांकनामधून २२२ अपात्र ठरले. त्यामुळे आता ७०३ कायम राहिले आहे. खरे चित्र २५तारखेनंतर स्पष्ट होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेल्या नामांकनात सर्वाधिक बाद होणाऱ्या नामांकनाची संख्या भंडारा आणि साकोलीत आहे. तर, नगराध्यक्षपदासाठी सर्वाधिक नामांकने भंडाऱ्यात बाद झाली आहेत. त्या पाठोपाठ साकोलीमध्ये हा क्रम आहे.

पवनी अध्यक्षपदासाठी ११ आणि सदस्यपदासाठी १५१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. अध्यक्षपदासाठी त्यापैकी ४ आणि सदस्यपदासाठी २८ उमेदवारांचे अर्ज रद्द करण्यात आले. सध्या अध्यक्षपदासाठी ७ आणि सदस्यपदासाठी १२४ उमेदवार रिंगणात आहेत. साकोली अध्यक्षपदासाठीनगरपालिकेत १६ आणि सदस्यपदासाठी १७१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, त्यापैकी झालेल्या छाननीत अध्यक्षपदासाठी ५ आणि सदस्यपदासाठी ५५ उमेदवारांचे अर्ज रद्द करण्यात आले. आताअध्यक्षपदासाठी ११ आणि सदस्यपदासाठी ११६ उमेदवार शिल्लक आहेत. तुमसर पालिकेत अध्यक्षपदासाठी २३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. आज छाननीदरम्यान १० अर्ज रद्द करण्यात आले. आता या पदासाठी १३ उमेदवार रिंगणात आहेत. भंडारा नगरपालिकेत उमेदवारांची संख्या जास्त असल्याने छाननी प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. भंडारा नगरपरिषदेत अध्यक्षपदासाठी २० अर्ज प्राप्त होते. त्यापैकी ६ अवैध ठरले तर १४ वैध ठरले. सदस्यपदासाठी ३०८ अर्ज दाखल होते. त्यापैकी ५७ अवैध तर २५१ वैध ठरले. निवडणूकीचे अंतिम चित्र २५ तारखेला अर्ज मागे घेतल्यानंतर स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *