उभ्या ट्रकवर भरधाव ट्रक आदळला; एक जखमी
खमारी (बुटी) : भंडारा तालुक्यातील पलाडी शिवारात महामार्गावर दि. १८ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १.३० वाजता दरम्यान भीषण अपघात घडला. उभ्या ट्रकवर भरधाव ट्रक आदळल्याने झालेल्या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला. पलाडी फाट्यासमोर महामार्गावर लाखनीच्या दिशेने जाणारा ट्रक क्र.सी.जी. ०८/ए. डब्लू. ६६१३ हाउभा होता.
त्यादरम्यान मागेहून जाणाराट्रक क्र.एम.एच.४०/सी. जी. १३७३ चा चालक प्रमोदकुमार (२१) रा. आंतरगाव (छ.ग.) हा रायपूरकडे जात असताना उभ्या ट्रकला मागेहून धडक दिली. त्यात शिवशंकर सिंह (३२) रा. कुलबहेरिया, रिवा (म.प्र.) जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच कारधा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला उपचारार्थ रुग्णालयात पाठविण्यात आले. पुढील तपास कारधा ठाण्याचे ठाणेदार गोकूल सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनात पो. हवा. रणधीर डोंगरे करीत आहेत.









