कर्ज फेडण्यासाठी सहाय्यक व्यवस्थापकानेच लुटले बँकेतील १.५८ कोटी रुपये

 

*तुमसर तालुक्यातील सितासावंगी येथील कॅनरा बँकेतील प्रकरण
*चार तासातच पोलिसांनी घेतला आरोपीचा शोध

*रोख ९६ लाख १२ हजाराचा इतर मुद्देमाल जप्त
*पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांची माहिती
भंडारा :- आँनलाईन गेम व शेअर मार्केटमध्ये कर्जबाजारी झालेल्या सहाय्यक व्यवस्थापकानेच तुमसर तालुक्यातील सितासावंगी येथील कॅनरा बँकेतील १ कोटी ५७ लाख रुपये चोरून नेल्याची घटना  घडली. घटनेची माहिती होताच पोलिसांचे विविध पथक स्थापन करून चार तासाच्या आत आरोपीचा छडा लावला. त्यांच्या ताब्यातून रोख ९६ लाख १२ हजार रुपये, एक ज्युपिटर मोपेड, नेक्सास चारचाकी, डिडीआर, सिसीटिव्ही व इतर  असा एकूण १ कोटी ७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी आज घेतलेल्या पत्रपरिषदेत दिली.
मयुर छब्बीलाल नेपाळे (वर ३२) रा. खात रोड, भंडारा असे ताब्यात घेतलेल्या सहाय्यक व्यवस्थापकाचे नाव आहे.

पोलीस अधीक्षक हसन यांनी पत्रपरिषदेत दिलेल्या माहितीनुसार, दि. १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.०० वाजता गोबरवाही पोलीसांना सितासावंगी मॉईल कॅम्प परीसरात असलेल्या कॅनरा बँक शाखा चिखला येथील समोरील चॅनल गेट आणि शटरचा ताला तोडुन बँकेच्या कॅशरुम मधील अंदाजे 1 करोड 58 लक्ष रुपये चोरीस गेल्याची माहीती प्राप्त झाली बँकेमधुन दिड कोटी रुपये चोरी झाल्याची माहीती प्राप्त झाली. लगेच गोबरवाही पोलीस निरीक्षक शरद शेवाळे यांनी सदरची माहीती जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांना दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवम विसापुरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर आणि गोबरवाही पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद शेवाळे हे त्यांच्या संपुर्ण ताफ्यासह सितासावंगी येथील कॅनरा बँकमध्ये पोहचले. घटनेची गांभीर्यता लक्षात घेता नूरुल हसन हे स्वतः घटनास्थळी सितासावंगी येथे पोहोचले.

याठिकाणी पोलीसांनी बँकेची बारकाईने पाहणी केली असता असे दिसून आले की, अज्ञात आरोपीने बँकेतील सी.सी. टि.व्ही कॅमे-यां सह कॅश रुम मध्ये असलेली जवळपास 1 कोटी 58 लक्ष रुपये चोरी करुन नेलेले आहे. त्यावरून पोलीस अधीक्षक भंडारा यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील ६ टिम, पोलीस स्टेशन गोबरवाही येथील ३, सायबर पोलीस स्टेशनची १ टिम तयार करून सदर चोरी उघड करणे संबंधाने रवाना केले.

सदर गुन्ह्याचा तपास करतांना असे दिसून आले की, सदर चोरी ही बँकेत कार्यरत असलेल्या अधिकारी/कर्मचारी यांच्या कडूनच करण्यात आलेली आहे. त्यावरून पोलीसांनी बँकेमधील कर्मचारी यांना विश्वासात घेवुन बारकाईने विचारपुस केली असता त्यांना कॅनरा बँकेत कार्यरत असलेले सहा. प्रबंधक मयुर छबीलाल नेपाले यांची दिनांक १७ नोव्हेंबर रोजीची वागणुक संशयास्पद असल्याचे निदर्शनास आली. मयुर नेपाळे हे दिनांक १८ नोव्हेंबर रोजी नागपुर येथे असलेल्या बँकेच्या प्रशिक्षणाकरीता दिनांक १७ नोव्हेंबर रोज नागपुर येथे त्यांची पत्नी राहात असलेल्या घरी गेले असल्याची माहीती मिळाल्याने स्थानिक शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक विवेक सोनवने यांना त्यांचे पथकासह नागपुर यथे संशयीत मयुर नेपाळे यांची पत्नी राहात असलेल्या ठिकाणी मयुर नेपाळे याचे शोधाकरीता रवाना करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नागपुर येथे गेल्यानंतर त्याठिकाणी मयुर नेपाळे हा मिळुन आला त्यास पोलीसांनी विश्वासात घेवुन बँकेतील चोरी संबंधाने विचारपुस केली असता त्याने सुरवातीला उडवा उडवीचे उत्तरे दिली त्यास पुनःश्च विचारपुस केली असता त्याने कॅनरा बँक शाखा चिखला येथील चोरीची कबुली दिली. त्याचेकडुन बँके मधुन चोरीस गेलेली 96 लक्ष 12 हजार रूपये, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी ज्युपीटर 80 हजार, एक टाटा नेक्सॉन चारचाकी वाहन किं. 10 लक्ष, रेड मी कंपनीचा मोबाईल 5 हजार, डि.व्ही.आर 4 हजार असा एकुण 1 कोटी 07 लक्ष 1 हजार रूपयांचा मुद्देमाल आरोपी सहा. प्रबंधक मयुर छबीलाल नेपाळे यांचेकडून जप्त करण्यात आले आहे.

गुन्ह्याचा तपासात आरोपीने कबुल केले की, त्यास ऑनलाईन गेमिंग, बेटिंचे व्यसन लागल्यामुळे त्याचेवर ३० लक्ष रूपये कर्ज झाले होते. त्याचप्रमाणे शेअर्स मार्केट ट्रेडीं मध्ये १२ लक्ष, कार लोन ८ लक्ष ५० हजार रूपये, एज्युकेशन लोन ३ लक्ष ५० हजार, पेटीएम लोन ३ लक्ष व इतर खाजगी इसमांकडून २० लक्ष असे एकुण ८० लक्ष ५० हजार रूपये परत फेड करणे करीता त्याने सदरची चोरी केलेली आहे. अधिक तपास शिवम विसापुरे उपविभागीय पोलीस अधिकारी साकोली अति. कार्यभार तुमसर हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *