भाजप व्यापारी, सुपारीबाज व माफियांचा पक्ष असल्याचा आरोप करीत नाजीनामा सत्र
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा : “भाजपमध्ये देश प्रथम, नंतर पक्ष, नंतर मी’ हे ब्रीद आता राहिलेले नाही. भाजप हा व्यापारी, सुपारीबाज व माफियांचा पक्ष झालेला आहे. यापूर्वी पक्षाने तिकीट देताना उमेदवाराकडे रक्कम व बँक बॅलन्स कधीच विचारला नव्हता, पण या वेळी स्त्री उमेदवारांना अशा प्रकारचे प्रश्न विचारून लाडक्या बहिणी म्हणवणाऱ्या मुख्यमंत्री साहेबांच्या आयाती नेत्याने पक्षातीलच लाडक्या बहिणींचा अपमान केला आहे’ असा खळबळजनक आरोप भाजप भंडारा शहराच्या उपाध्यक्ष तथा माजी नगरसेविका वनिता कुथे यांनी केला आहे.
पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा व पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा देताना त्यांनी राजीनामा पत्रात अत्यंत घणाघाती आरोप भाजप पक्षावर आणि स्थानिक पक्ष नेतृत्वावर केले आहे. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विकास मदनकर, भाजपा महिला जिल्हा उपाध्यक्षा कल्याणी भुरे, भाजप महिला आघाडी माजी महामंत्री विजया नंदुरकर, जिल्हा महिला व्यापारी आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अर्चना श्रीवास्तव, भाजपा भंडारा शहर माजी महामंत्री सुदीप शहारे यांच्यासह अनेक निष्ठावंतानी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला रामराम ठोकला.
या सर्वांनी त्यांच्या राजीनामा पत्रात भाजप पक्ष नेतृत्वावर गंभीर आरोप केले आहेत. भाजप हा पक्ष मजबूत संघटनासाठी सर्वपरिचित आहे. मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भंडारा जिल्ह्यात भाजपाच्या दारूण पराभवानंतर स्थानिक पक्ष नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. आज जिल्ह्यात भाजपाचा एकही आमदार किंवा खासदार नाही. त्यामुळे ही नगरपालिका निवडणूक भाजपसाठी केवळ प्रतिष्ठेचीच नाही तर वर्चस्वाची लढाई ठरली आहे. अर्चना श्रीवास्तव यांनी भाजप हा “बिजनेस पक्ष’ झाल्याचा आरोप केला होता तर कल्याणी भुरे यांनी “भाजपात महिलांना स्थान नाही’ असा गंभीर आरोप करत पक्षाचा राजीनामा दिला होता.
सुदीप शहारे यांनी “भाजप हा विश्वाघातक पक्ष’ असल्याचा आरोप केला. जिल्हा उपाध्यक्ष विकास मदनकर यांनी “भाजपाच निष्ठावंतांना स्थान नाही’ असा आरोप करून राजीनामा भाजपा प्रदेश अध्यक्षांना पाठविला. आत्मनिष्ठेने, प्रामाणिकपणे आणि पक्षाच्या तत्त्वार अखंड श्रद्धा ठेवून काम करणाऱ्यांची आता पक्षात किंमत नसून केवळ चापलुसी करणाऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना स्थान असल्याचे मदनकर यांनी म्हटले आहे. सध्या उमेदवारी वाटपावरून भाजपमधील अनेक इच्छुक मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. भाजपने उमेदवारी घोषित केलेले ३५ पैकी २१ उमेदवार इतर पक्षातून आलेले आहेत. त्यामुळे अनेकांनी विद्रोह करत आणि अत्यंत जड अंतकरणाने पक्षातून आहेर. त्यामुळे अनेकांनी विद्रोह करत आणि अत्यंत जड अंतकरणाने पक्षातून बाहेर निघण्याचा निर्णय घेतला. काल पक्षातील इच्छुक उमेदवार आणि इतर पक्षातून उमेदवारीचे कमिटमेंट करून भाजपमध्ये पक्षप्रवेश दिलेल्यांना उमेदवारीपासून दूर ठेवण्यात आले. त्यामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची घोषणा होताच पक्षांतर्गत असंतोषोची लाट उसळली.
नगरसेवक पदाची उमेदवारी मिळवण्यासाठी अनेकांनी जीवाचे रान केले होते. मात्र ऐनवेळी त्यांना बगल देत अनुभव नसलेल्यांना उमेदवारी देण्यात आल्याचा आरोप आता पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी करत आहेत. कुथे यांनी त्यांच्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, गेल्या २० वर्षापर्यंम मी भाजपची सक्रीय सदस्य म्हणून काम करीत होती. पक्षाच्या अडचणीच्या दिवसात पक्षासाठी जीवावर ओतून काम केले आहे. परंतु, सध्यास्थितीत नगरसेवक असतांना सुद्धा पक्षाने केलेला सर्व्हे व निवडून येणाऱ्या संभावित उमेदवारामध्ये तुमचे नाव असल्याने तुमचे तिकीट पक्के आहे असं सांगून माझा विश्वास घात करून माझरी तिकीट कापण्यात आले व ८ ते १० दिवसात पक्षात आलेल्या नवख्या महिलेले जिल्हा राजकारण व समाजकारणाचा गंध सुद्धा नाही अशा व्यक्तीला पक्षाचे तिकीट देण्यात आले. त्यामुळे मी अत्यंत दुखावले असून मला असहाय्य वेदना होत आहेत.’ असे लिहून त्यांनी पुढे पक्ष आणि पक्ष नेतृत्वावर खळबळजनक आरोप केले आहे.









