विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळावा १६ डिसेंबर रोजी नागपूरात
भंडाराः विदर्भ राज्य आंदोलन समितीने मिशन २०२७ जाहीर केले असून २०२७ संपन्यापूर्वी विदर्भ राज्य मिळवणारच असा निर्धार जाहीर केला आहे. ग्रामीण भागात गावागावात विदर्भआंदोलनाची धग पोहचविण्याच्या दृष्टीने ६ विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळावे घेण्यात आले. त्यात मेळघाट सारख्या अतिदुर्गम भागातील समावेश आहे. त्याच बरोबर कारंजा लाड गडचिरोली -गोंदिया अमरावती (बडनेरा) व भंडाऱ्यातील जनतेचा सहभाग वाखाण्या जोगा होता.
विदर्भ राज्य आंदोलन समितीने १२० वर्षांपासून पारतंत्र्यात असल्यापासूनची विदर्भ राज्याची मागणी कायम निकाली काढण्याच्या दृष्टीने व १०० वर्षे महाराष्ट्रात राहिले तरी व ब्रम्ह देवाला मुख्यमंत्री केले तरी महाराष्ट्र दिवाळखोरीत निघाला आहे. राज्याचे महसूली उत्पन्न ५ लाख ६० हजार ९६३कोटी रुपये असून, महाराष्ट्रावर असणाऱ्या कर्ज व व्याजाचा बोझा ९ लाख ८३ हजार कोटी रुपये आहे. याशिवाय सरकारला १० महिन्यापूर्वी कंत्राटदारांनी केलेल्या बांधकामाचे उदारणार्थ सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, जलसंपदा व जलसंधारण, जलजीवन मिशन, ग्रामविकास, नगरविकास व डी.पी. सी च्या बांधकामाच्या एकूण ९५ हजार ७३२ कोटी रुपयाच्या लायबिलीटीज डिस्चार्ज करायचे आहे. असे १० लाख ५९ हजार ४५९ कोटी रुपये देण्याची राज्याची अयपत नाही.
शहरी भागात विदर्भआंदोलनाचा वनवा घराघरात पेटविण्याच्या दृष्टीने व महाराष्ट्राच्या दिवाळखोरीत निघालेल्या परिस्थितीचे खरे चित्र शहरी जनतेच्या नजरेपुढे आणून जनजागृती करण्याच्या दृष्टीने व विदर्भाचे स्वतंत्र राज्य हेच या सर्व प्रश्नांचे उत्तर आहे. हे समजावून सांगण्याच्या हेतूने दि १६ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता नागपूर शहरातील विदर्भ चंडिका मंदिर, शहीद चौक, इतवारी पासून’ लॉग मार्च’ टांगा स्टॅन्ड चौक- नंगा पुतला चौक – डागा हॉस्पिटल चौक अग्रसेन चौक भालदारपुरा होत चिटणीस पार्क पर्यंत येऊन दुपारी १ वाजता चिटणीस पार्कवर भव्य “विदर्भनिर्माण जनसंकल्प मेळावा’ आयोजित केला आहे.तरी सर्व जनतेनी सक्रिय सहभाग नोंदवावा व लॉग मार्च व मेळावा यशस्वी करावा असे आवाहन वि.रा.आ.स. करीत आहे.
भंडारा जिल्हा बैठक गणेशपूर येथील गुरुदेव सेवा मंडळ येथे दि. १८ नोव्हेंबर रोजी भंडारागोंदिया वभागीय अध्यक्ष संजय केवट यांच्या आयोजनात पार पडली. बैठकीला ला युवा आघाडी विदर्भप्रदेश अध्यक्ष मुकेश मासुरकर, पूर्व विदर्भ उपाध्यक्ष सुनील चोखारे, विदर्भ प्रचार प्रमुख तात्या मत्ते, नागपूर जिल्हा समन्वयक प्रदीप शिरसकर प्रामुख्याने उपस्थित होते. या वेळी इकराम मेश्राम यांना मोहाडी तालुका अध्यक्ष, कविता ठाकरे यांना भंडारा तालुका महिला अध्यक्षा, ज्ञानेश्वर फंदे यांना युवा आघाडी भंडारा तालुका अध्यक्ष पद देण्यात आले. बैठकीला गडबडी भुरे, पिंटू पटले, गिरधारी मेहर, श्रीहरी भोंगाडे, दामोधर टिचकुले, निलेश सूर्यवंशी सह गुरुदेव सेवा मंडळाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.









