शक्ती प्रदर्शन दाखवित उमेदवारांचे नामांकन दाखल

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- नगरपरिषद निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. यामुळे नामांकन दाखल करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात मोठी गर्दी उसळली होती. भंडारा येथे काँग्रेस, भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी रॅली काढून शक्ती प्रदर्शन दाखवित आज नामांकन दाखल केले.

यामुळे आज भंडारा येथे यात्रेचे स्वरूप आले होते. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होते. भंडारा येथे नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या उमेदवार सौ. जयश्री रविंद्र बोरकर,भाजपाच्या उमेदवार सौ. मथुरा मिलींद मदनकर, शिंदे सेनेच्या उमेदवार डॉ. अश्विनी नरेंद्र भोंडेकर, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सौ. सुषमा सुनिल साखरकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सौ. माधुरी मधूकर चौधरी यांनी नामांकन दाखल केले.

यावेळी त्या त्या पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. नामांकन दाखल करण्यापूर्वी मंगल कार्यालयात सभा घेवून रॅली काढली. या रॅलीतून त्यांनी शक्ती प्रदर्शन दाखविण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक पक्षाच्या रॅलीत त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हातात झेंडे घेतले होते. आज ज्यांना पक्षाची उमेदवारी मिळेल अशी आशाहोती पण पक्षाची उमेदवारी मिळाली नाही, त्यांनीही बंडखोरी करीत आपले नामांकन दाखल केले. आता त्या बंडखोरांना वळविण्यासाठी पदाधिकारी कामाला लागणार आहेत, हे विशेष.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *