हायमास्ट दिव्याकरिता फाउंडेशन तयार, लाखोंची बिले खर्ची मात्र पोल व दिवे केव्हा लावणार?
पालांदूर:- येथील बाजार चौकात संत गाडगेमहाराज यांच्या पुतळ्याच्या बाजूला हायमास्ट लाईट लावण्याकरिता मागील वर्षी फाउंडेशन तयार केल्या गेले, मात्र वर्षभराचा कालावधी पूर्ण होऊनही या फाऊंडेशनवर अद्याप हायमास्ट दिव्याकरिता पोल आणि हायमास्ट दिवे लावले गेले नसल्याने याकडे स्थानिक प्रशासनाने मुद्दाम दुर्लक्ष केले की संबंधीत ठेकेदाराने हलगर्जीपणा केला?असा प्रश्न येथील सुज्ञ नागरिकांना पडला आहे.









