हजारो कोटींची विकासकामे जाड भिंगाचा चष्मा अन दुर्बिण लावूनही दिसली नाहीत; सुनील तटकरेंचा भरत गोगावलेंना खोचक टोला

मुंबई:- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी नाव न घेता मंत्री भरत गोगावले यांना खोचक टोला लागवालय. “हजारो कोटींची विकासकामे झाल्याचे बोलणाऱ्यांची कामे मी जाड भिंगाचा चष्मा लावून पाहिली, दुर्बीण लावूनही शोधली. पण महाडमध्ये विकास दिसलाच नाही,’ अशा शब्दांत सुनील तटकरे यांनी मंत्री भरत गोगावले यांच्यावर निशाणा साधलाय. महाडमध्ये नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कार्यक्रम तटकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना सुनील तटकरे यांनीभरत गोगावले यांच्यावर हल्लाबोल केला. सुनील तटकरे म्हणाले की, या निवडणुकीत आमच्यासमोर खूप अजेंडे आहेत. गेली चार वर्ष इथे स्थानिक लोकप्रतिनिधी नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *