गोंदिया शहराचा विकास फक्त राष्ट्रवादी कॉगे्रस पक्षच करू शकतो-खा. प्रफुल पटेल

गोंदियाः- गोंदिया शहराचा ज्या प्रकारे विकास व्हायला पाहिजेत होता तसा विकास अद्याप पर्यंत झालेला नाही. आणि गोंदिया शहराला अपेक्षित असलेला विकास हा फक्त राष्ट्रवादी कॉग्रेस नगर परिषदेत सत्त्तेवर आल्यावरच होवू शकते. गोंदिया शहराची सध्याची बकाल अवस्था बघून खासदार प्रफुल पटेल यांनी चिंता व्यक्त केली आहे.

माध्यमांशी बोलतांना गोंदिया जिल्ह्याचा तसेच गोंदिया शहराचा हवा तसा विकास न करण्याकरिता येथील राजकिय वातावरण आणि राजकारणी यांना धारेवर धरले आहे. आपण महाराष्ट्रातील इतर शहर बघतो त्याप्रमाणे गोंदिया शहराचा विकास झालेला नाही याला यापूर्वी या नगरपरिषदेत सत्तेत असलेले राजकारणी जवाबदार असल्याचा आरोप खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. तसेच गोंदियाकरांना गोंदिया शहराला साजेसा विकास करायचा असेल तर एकदा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाला गांेदिया नगर परिषदेची सत्ता द्यावी .

कारण गोंदिया शहराचा विकास करण्याची दुरदृष्टी फक्त राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाकडे आहे. यामुळे फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच गोंदियाचा विकास करू शकतो असे मत खासदार प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केले. रविवार १६ नोव्हेंबर रोजी आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलतांना खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले की मी स्वतः गोंदिया नगर परिषदेचा अध्यक्षपदी ७ वर्ष राहिलेला आहे. माझे वडील दिवंगत मनोहरभाई पटेल पण २७ वर्ष गोंदिया नगर परिषदेचे अध्यक्ष राहिलेले आहेत.म्हणून मला आणि माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना गांेदिया शहराची काळजी वाटते की, गोंदिया शहराचा विकास अत्यंत तीव्र गतीने झाला पाहिजे.गोंदिया शहराची सध्याची अवस्था बघता शहराची खूप काळजी वाटते. याकरिता दोष पण कुणाला द्यायचा कारण गेल्या चार वर्षापासून गोंदिया नगर परिषदेवर प्रशासकिय राज चालत होता. यामुळे कुणाला दोष देणे योग्य नाही.

गोंदिया शहराची दुर्दश पाहून मला वाटते की, हेच का ते माझे शहर… आज गोंदिया शहरात सर्वत्र पसरलेली घाण आणि जागोजागी केर कचरा याला पाहून मला वाटते की, गोंदिया शहराला एक वैभव मिळवून देण्याकरिता गांेदियाकरांनी यावेळी विचार करावा कारण गोंदिया शहराला फक्त राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष सत्तेवर आला तर विकास करू शकतो.त्यामुळे माझे गोंदियाकरांना आव्हान आहे की, यावेळी त्यांना संधी मिळाली आहे. तर त्यांनी या संधीचे सोने करावे आणि गोंदिया शहराचा अदभुत विकास घडवून आणण्याकरिता गोंदिया नगर परिषदेत राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाला सत्ता द्यावी असे आवाहन त्यांनी गोंदिया शहराला केले आहे. रविवारी खासदार प्रफुुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी माजी नगरसेवक दिलीप गोपलानी, अनिल ककवानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खा.पटेलाच्या हातून पक्षांचा दुपट्टा घालुन प्रवेश केला.या प्रसंगी मोठ्या प्रमाणात पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *