इन्स्पायर मानक अवॉर्ड जिल्हास्तरीय प्रदर्शन

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- राज्य विज्ञान शिक्षण संस्था, रविनगर, नागपूर व शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद भंडारा व गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने इन्स्पायर मानक अवॉर्ड सन २०२३ २४ व सन २०२४ – २५ मधील निवडपात्र विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे भंडारा व गोंदिया जिल्ह्याचे जिल्हास्तरीय प्रदर्शनाचे आयोजन SGB डिफेन्स सर्व्हिसेस ज्युनियर कॉलेज शहापूर येथे दिनांक १४ व १५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन सावनकुमार जिल्हाधिकारी, भंडारा यांचे हस्ते करण्यात आले. उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थानी छखऋड अहमदाबाद येथील हितेन डोमाडिया हे होते.

थोर वैज्ञानिक डॉ. ए.पी.जे.अब्दुलकलाम, सर सी. वी. रमण, डॉ. होमी भाभा, चंद्रशेखर बोस यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करून दीपप्रज्वलन करून राष्ट्रगीत व राज्यगीताने उद्घाटन सत्राचे शुभारंभ करण्यात आले. प्रास्ताविक मनिषा गजभिये, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद भंडारा यांनी केले. विद्यार्थ्यांनी स्व: अभिव्यक्तीने व कल्पनेतून साकारलेले मॉडेल्सचे जिल्हाधिकारी महोदयांनी कौतुक केले व भविष्यात विद्यार्थ्यांच्या कल्पनांना संधी प्राप्त करून देण्याबरोबरच बाल वैज्ञानिक वृत्ती निर्मिती करिता इन्स्पायर मानक या योजनेअंतर्गत आयोजित प्रदर्शनास आपल्या उद्घाटकीय मनोगतातून शुभेच्छा व्यक्त केल्या.

रवींद्र सोनटक्के, शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ योजना), इन्स्पायर मानक अवॉर्डचे राज्य समन्वयक डॉ. रविंद्र भास्कर यांचे समवेत माध्यमिक विभागाचेउपशिक्षणाधिकारी देवेंद्र शेंडे, रमाकांत झाल्टे, प्राथमिकचे श्री. राहुल बावा व मोहन उशिरे तसेच शिक्षण विस्तार अधिकारी रवींद्र माडेमवार, भंडारा जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष प्रमोद सेलोकर, सचिव चंद्रशेखर हुमने व सर्व सदस्यगण यांची उपस्थिती होती. परीक्षक डॉ. मुंदीप आवळे, डॉ. बी. वाय. कठाने, डॉ. ज्ञानेश्वर गोपाले व श्री. महेश मुदलियार यांची मंचावर उपस्थिती होती.SGBडिफेन्स सर्व्हिसेस ज्युनियर कॉलेज शहापूरचे संस्थापक नरेंद्र पालांदुरकर यांनी मनोगत व्यक्त केले. संचलन सहायक शिक्षक मुकुंद ठवकर व वैशाली लेंडे यांनी तर उद्घाटन आभार उपशिक्षणाधिकारी रमाकांत झाल्टे सर यांनी व्यक्त केले व वंदे मातरम गीताने उद्घाटन संपन्न झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *