अजित पवारांनी सांगितलं बिहारमध्ये NDA च्या विजयाचं राज “कारण’; मोदी अन नितीशकुमारांचं अभिनंदन
मुंबई:- देशाचं लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालात एनडीए आघाडीला मोठं यश मिळालं आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांप्रमाणेच बिहारचे निकाल लागल्याचं दिसून येत आहे. बिहारमध्ये भाजप-जदयू आघाडीला २०० पेक्षा जास्त जागांवर विजयी आघाडी मिळत आहे. तर, काँग्रेस-राजद महागठबंधनला केवळ ३९ जागांवर विजयी आघाडी सध्या दिसून येत आहे. त्यामुळे, विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप एनडीला मोठं यश मिळाल्याने महाराष्ट्रात महायुतीचे समर्थक, नेते आणि कार्यकर्ते आनंद व्यक्त करत आहेत. राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या विजयानंतर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, बिहारमधील जनतेने डबल इंजिन सरकारला पुन्हा एकदाभरघोस कौल दिला आहे.
या अभूतपूर्व यशाबद्दल बिहारमधील एनडीएच्या सर्व घटक पक्षांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो.”, असेही त्यांनी म्हटले. बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) मिळिवलेला विजय हा ऐतिहासिक असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावरील जनतेच्या दृढविश्वासाचे ते प्रतीक आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, “”बिहारमध्ये एनडीएच्या सरकारने समाज कल्याणाच्या अनेक क्रांतिकारी योजना राबवल्या. तेथील लाडक्या बहिणींचेसुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणात आशीर्वाद लाभले, त्याचंच हे यश आहे. बिहारमधीलजनतेने डबल इंजिन सरकारला पुन्हा एकदा भरघोस कौल दिला आहे. या अभूतपूर्व यशाबद्दल बिहारमधील एनडीएच्या सर्व घटक पक्षांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो.”, असे अजित पवार यांनी म्हटले.









