भंडारा नगराध्यक्ष पदासाठी जयश्री बोरकर यांना काँग्रेसची उमेदवारी निश्चित?
भंडारा नगरपरिषद नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ. जयश्री बोरकर यांना निश्चित झाली आहे. त्यांच्या नावाचे एबी फार्मही आज मुंबईत तयार झाले असून जिल्ह्यातील एका पदाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आले असल्याची माहिती आहे. सोबतच तुमसर, पवनी व साकोली-सेंदुरवाफा येथील नगराध्यक्ष व सदस्यांचेही नावही निश्चित झाले आहेत. दि. १५ नोव्हेंबर रोजी सर्वांना एबी फॉर्म देण्यात येणार असल्याचेही वृत्त आहे.







