नगराध्यक्ष व सदस्यांचे नाव अद्यापही गुलदस्त्यात

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- नामांकन दाखल करण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक आहेत. मात्र कुठल्याही पक्षाकडून नगराध्यक्ष पदाचा चेहरा जाहीर झालेला नाही. दोन दिवसात उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वेगवेगळ्या नावाची चर्चा सुरु असली तरी तिकिट कुणाला मिळणार, हे दोन दिवसात कळणार आहे. नामांकन दाखल करण्याच्या आजच्या चवथ्या दिवशी चारही नगराध्यक्ष पदासाठी एकही नामांकन दाखल झाले नाही. मात्र सदस्य पदासाठी तुमसर येथे ३, साकोली ६ तर भंडारा येथे ५ नामांकन दाखल करण्यात आले. पवनीत अद्यापपर्यंत एकही नामांकन दाखल करण्यात आला नाही.

भंडारा नगरपालिकेमध्ये भाजप, काँग्रेस, शिवसेना आणिराष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट मैदानात राहणार आहेत. या सोबतच आंबेडकरवादी विचारांचे समविचारी पक्ष आणि गटांनी एकत्र येत आझाद बहुजन रिपब्लिकन आघाडीची स्थापना केली आहे. यामुळे उमेदवारांची घोषणा करतांना सर्वच पक्ष एकमेकांच्या उमेदवारांच्या नावाकडे लक्ष देवून आहेत. बंडखोरी आणि नाराजी टाळण्यासाठी सर्वच पक्षातील नेतेमंडळी अलर्ट मोडवर आहेत. यामुळेच नावांच्या घोषणेसाठी विलंब होत आहे. काही ठिकाणी संभाव्या नावांवर पुन्हा फेरविचार सुरू झाला असल्याने जनमत चाचपण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.नगराध्यक्ष व सदस्यांचे नाव अद्यापही गुलदस्त्यात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *