आ. नाना पटोले काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव होणार?

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी विधानसभा अध्यक्ष तथा साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले हे लवकरच राष्ट्रीय राजकारणात जाणार आहेत. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महासचिव पदी त्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती आहे. आमदार नाना पटोले हे काँग्रेस नेते खा. राजीव गांधी यांच्या जवळचे आहेत. त्यामुळेच त्यांना राष्ट्रीय राजकारणात घेण्याचा निर्णय अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने घेतला आहे. त्यांची राष्ट्रीय महासचिवपदी नियुक्तीची घोषणा लवकरच होणार आहे.







