भाजपा प्रभाग १३ मध्ये हिंदू चेहरा देणार का?
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा नगर परिषद प्रभाग क्रमांक १३ मध्ये २५ वर्षापूर्वी कांतीलाल निर्वाण हे निवडून आले होते. त्यानंतर मात्र या प्रभागात हिंदुत्ववादी चेहरा निवडून आला नाही. भारतीय जनता पार्टी या प्रभागात हिंदुत्ववादी चेहरा देणारा का? अशी चर्चा सुरु झाली आहे. प्रभाग क्र. १३ मध्ये मुस्लिम लायब्ररी, डॉ. झंवर हॉस्पिटल, महल, गांधी चौकाचा काही भाग व राजीव गांधी चौकाचा काही भाग आला आहे.
पूर्वी प्रभागात मुस्लिम मतदारांची संख्या जास्त असल्याने तेथून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार निवडून येतो. २५ वर्षापूर्वी हिंदू समाजाचे कांतीलाल निर्वाण हे या भागातून निवडून आले होते. त्यानंतर या प्रभागात भाजपा कङून काही हिंदुत्ववादी उमेदवार देण्यात आले होते, परंतु कट्टर तसेच प्रखर मोठा हिन्दुत्वाचा चेहरा नव्हता. आता प्रभाग रचना नव्याने झाल्याने या भागातून भारतीय जनता पार्टी असा एखादा मोठा हिंदूत्वादी ब्रांड उमेदवार म्हणून देतो की मुस्लिम उमेदवार याकडे लक्ष लागले आहे.
या प्रभागातील चर्चेनुसार या प्रभागात काँग्रेसचे इमरान पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे बल्लीभाई आणि शिवसेना शिंदे गटाचे मकसूद बंशी हे निवडणूक लढविणार आहेत.
मयुर बिसेन यांना उमेदवारी देण्याची मागणी
प्रभाग क्र. १३ मध्ये सकल हिंदु समाजाचे मतदार हिंदू उमेदवार देण्यात यावा अशी मागणी करीत आहेत.
श्रीराम शोभायात्रा समितीचे अध्यक्ष तसेच धर्मांतरण रोको प्रकरणात शिक्षा भोगणारे भाजपाचे जिल्हा महामंत्री मयुर बिसेन यांना या प्रभागातून उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी पक्ष श्रेष्ठींकडे होत आहे. मयुर बिसेन यांचा भंडारा शहराचा दांडगा अनुभव आहे. त्यांनी हिंदु समाजासाठी अनेक कार्य केले आहेत व आजही करीत आहेत. मयुर बिसेन यांना या प्रभागातून उमेदवारी दिल्यास ते नक्कीच निवडून येवू शकतात व प्रभागात भाजपचे नेतृत्व येवू शकते, असेही काहींचे म्हणणे आहे. याबाबत मयुर बिसेन यांचेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होवू शकला नाही.







