नूतन कन्या शाळेचे दोन संघ राज्यस्तरावर
दै. लोकजन वृत्तसेवा सिल्ली /आंबाडी :- महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागस्तर शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धा येथे संपन्न झाल्या. यात १४ वर्षे मुलींच्या गटात नूतन कन्या शाळा संघाने गडचिरोली संघाचा १०-० आणि नागपूर मनपा संघाचा ८ -३ ने पराभव केला. तसेच १७ वर्षाखालील मुलींच्या गटातही नागपूर मनपा संघाचा ७-२ ने पराभव केला. त्यामुळे मुंबई तसेच अहिल्यानगर येथे होणाऱ्या शालेय राज्यस्तर बेसबॉल क्रीडा स्पर्धेसाठी दोन्ही संघाची निवड झाली. संघात काव्या रहांगडाले, आनिया बालपांडे, मृणाली येनोरकर, विधी कठाने, अक्षदा शेंडे, रूपाली येनोरकर, कनिष्का पवनकर पुनम कावळे, हर्षदा ढवळे, सौम्या कदम, अक्षदा घाटोळे, आरोही धोत्रे, कस्तुरी सरगे, किंजल केसलकर, कृतिका सिरसागर, यशस्वी गोंधळे, नयना देव्हारे, श्रेया जगनाळे, दिव्यांशी बालपांडे, प्रतीक्षा बसिणे,जानवी हर्षे, जागृती सहारे, गुंजन मेश्राम, रूपाली येनोरकर, अर्पिता शेंडे, श्रेया खंडाळे, नव्या मुरे, प्राची भुजाडे, दिया सूर्यवंशी, अंसिका सूर्यवंशी, राणू नीनावे, ग्रीष्मा मदनकर, प्रतीक्षा ईश्वरकर, आर्या सेलोकर, यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. संघाला क्रीडा शिक्षक बेनीलाल चौधरी, शुभांगी येनोरकर, अंकित भगत, काजल तिघरे यांचे प्रशिक्षण लाभले. संस्थाध्यक्ष एड. एम. एल. भुरे, सचिव शेखर बोरसे, प्राचार्या नीलू तिडके, उपमुख्याध्यापक कैलास कुरंजेकर, रेखा पनके, मोहन दाढी, अरुण बांडेबुचे, बेसबॉल संघटनेचे सचिव विजय सुखदेवे, जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाडे, क्रीडा अधिकारी निखिलेश तभाने इत्यादीनी कौतुक केले.







