जिल्हा वकील संघ भंडारा निवडणुकीत अध्यक्षपदी ॲड. नितीन राहांगडाले व सचिवपदी ॲड. धनंजय बोरकर
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- दि.१० नोव्हेंबर २०२५ ला झालेल्या जिल्हा वकील संघ भंडाराच्या वार्षीक निवडणुकीत अध्यक्षपदी ॲड. नितीन राहांगडले तर उपाध्यक्षपदी ॲड. मंजुषा गायधनी, सचिवपदी ॲड. धनंजय बोरकर, तर सहसचिवपदी ॲड. कार्तीक श्रावणकर आणि कोषाध्यक्षपदी ॲड. नेहा शेंडे हे बहुमताने निवडुन आले. जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीत संपुर्णपणे ॲड. नितीन राहांगडाले गटाचे संपुर्ण पॅनलचे उमेदवार निवडुन आले.
अध्यक्ष पदाचे उमेदवार ॲड. नितीन राहांगडाले यानां १७३ मते मिळाली व ते ५४ मतानी विजय झाले, तर उपाध्यक्ष पदाचे उमेदवार ॲड. मंजुषा गायधनी यांना १६४ मते मिळाली व त्या ३५ मतानी, तर सचिव पदाचे उमेदवार ॲड. धनंजय बोरकर यांना १७४ मते मिळाली व ते ५९ मतानी, तसेच सहसचिव पदाचे उमेदवार ॲड. कार्तीक श्रावणकर यांना १५७ मते मिळाली व ते २६ मतानी व कोषाध्यक्ष पदाचे उमेदवार ॲड. नेहा शेंडे यांना १८१ मते मिळाली व त्या ७३ मतानी निवडुन आल्या.
जिल्हा वकील संघ भंडाराची निवडणुक प्रक्रिया निवडणुक अधिकारी ॲड. सुधीर मेश्राम यांच्या मार्गदर्शनात अतिशय निमुटपणे पार पडली. ॲड. राहांगडाले गटाचे पुर्ण उमेदवार निवडुन येण्यासाठी हया गदाचे ॲड. राजेश राउत, ॲड. विवेक स्वामी, ॲड. प्रविन रामटेके, ॲड. डि.के. वानखेडे, ॲड. निला नशीने, ॲड. विजय दलाल, ॲड. मधुकांत बांडेबुचे, ॲड. राजकुमार वाडीभस्मे, ॲड. आरीफ खान, ॲड. संजीव गभभिये, ॲड. पदमाकर टेंभुर्णीकर, ॲड. मधुकर वटेटवार, ॲड. विश्वास तवले, ॲड. सतिश ठवकर, ॲड. नितीन बोरकर, ॲड. श्याम चव्हान, ॲड. दिलीप भोयर, ॲड. प्रमोद आठवले, ॲड. दिलीप कातोरे, ॲड. रवि भुसारी, ॲड. एम. जी. हरडे, ॲड. आर. जी. काटेखाये, ॲड. सुरदास चौरे, ॲड. दिलीप पटले, ॲड. कमरूनिशा शेख, ॲड. एम. बी. नंदागवळी, ॲड. एम. एम. चव्हान, ॲड. राजकुमार उके इत्यादी वकील मंडळीनी सहकार्य केले.









