आता आठ दिवसात होणार दिव्यांग अधिकारी, कर्मचारी व शिक्षकांची पडताळणी

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय मुंबईचे सचिव तुकाराम मुंडे यांच्या पत्रान्वये सर्व दिव्यांग शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांची पडताळणी जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडून होणार आहे. सर्व खातेप्रमुखांनी तसे पत्र काढले आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांनी सुद्धा दि. ११ नोव्हेंबर २०२५ रोजी तसे पत्र काढले आहे. राज्यात बोगस दिव्यांगाचा प्रश्न उपस्थित होताच दिव्यांग कल्याण विभागाने राज्यातील दिव्यांग कर्मचाऱ्यांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी तसेपत्र राज्यातील सर्वच विभागाला दिले आहे. त्यानुसार उपमुख्यकार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) जि. प. भंडारा यांनी दि. १० ऑक्टोंबर २०२५ रोजी जिल्हा परिषदअंतर्गत येणारे सर्व खाते प्रमुख, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व क्षेत्रिय अधिकारी यांना पत्र पाठवून त्यांच्या विभागात असलेल्या सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात यावी असे पत्र पाठविले होते. मात्र त्या पत्राकडे अनेकांनी दुर्लक्ष केले होते. पुन्हा ७ नोव्हेंबर २०२५ रोजी दिव्यांग कल्याण विभागाचेसचिव तुकाराम मुंडे यांनी व्ही. सी. बैठक घेवून तसेच सर्व विभाग प्रमुखांना पत्र पाठवून सर्वच दिव्यांग कर्मचाऱ्यांची पडताळणी करण्याचे निर्देश देवून तसा अहवाल पाठविण्यास कळविले आहे. तसेच १० दिवसाचे आत आपल्यामार्फत एकत्रीत सादर करावा, असेही कळविले आहे.

त्यानुसार शिक्षणाधिकारी प्राथमिक जि. प. भंडारा यांनी दि. ११ नोव्हेंबर २०२५ रोजी पत्र काढून सर्व गटशिक्षणाधिकारी, लाल बहादूर शास्त्री विद्यालय भंडाराचे मुख्याध्यापक, जकातदार कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक यांना पत्र पाठवूनदिव्यांग कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व पडताळणीकरीता जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडू पाठवून पडताळणी अहवाल सादर करण्याबाबत कळविले आहे. पडताळणी अंती दिव्यांगत्वाची लाक्षणिक दिव्यांगत्वापेक्षा ४० टक्के पेक्षा कमी आहे व सदर अधिकारी/ कर्मचारी यांचकडे चुकीची अथवा बोगस दिव्यांगत्व प्रमाणपत्र/ वैश्विक ओळखपत्र आढळून आल्यास दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ नुसार कार्यवाही करण्यात यावी, तसेच त्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *