युती आघाडी बाबत संभ्रम! त्यामुळे कायम; सर्वच प्रमुख पक्षांचे “वेट अँड वॉच’ ची भूमिका उमेदवारीचा तिढा
गोंदिया :- नगर परिषद आणि नगरपंचायतची निवडणूक २ डिसेंबरला होणार आहे. यासाठी सोमवार १० नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. प्रमुख पक्ष असलेले भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदे सेना यांची युती होणार की नाही याबाबत संभ्रम कायम आहे तसेच काँग्रेस आणि उभाठा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) यांच्यात पण आघाडी होणार की नाही यावरही अद्याप पर्यंत प्रश्नचिन्ह लागलेले आहे.
यामुळे सर्व प्रमुख पक्षांचे अद्याप उमेदवार निश्चित झालेले नाही. तर अपक्ष निवडणूक लढविणाऱ्या उमेद्वारांचे सुद्धा अद्याप तळ्यात मळ्यात सुरू आहे. त्यामुळेच उमेद्वारी अर्ज दाखल करण्याच्या सोमवारी पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला नसून सर्वच “वेट अन्ड वॉच’ च्या भूमिकेत असल्याचे चित्र आहे.
गोंदिया, तिरोडा नगर परिषद आणि सालेकसा व गोरेगाव नगरपंचायतची निवडणूक २ डिसेंबरला होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली. १७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. पण युती आघाडीचे कोडे अद्यापही उकलले नाही. तर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना या सर्वच पक्षांचे उमेदवार अद्याप निश्चित झाले नाही.
सर्वच पक्षांनी येत्या दोन तीन दिवसांत उमेद्वारांची यादी जाहीर केली जाईल असे सांगितले. त्यामुळेच सोमवारी निवडणूक होऊ घातलेल्या चारही ठिकाणी एकही उमेद्वारी अर्ज दाखल झाला नव्हता. सर्वच पक्षात इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे पक्षांतर्गत होणारी बंडखोरी थांबविण्याकरिता शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी घोषित करण्यात येणार असे चित्र आज घडीला निर्माण झाले आहे. त्यातच युती आणि आघाडी झाल्यास अनेकांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंडखोरी होण्याची शक्यता असल्याने उमेदवारांची यादी जाहीर करण्यास विलंब केलाजात असल्याची माहिती आहे.









