शिक्षण उपसंचालक कार्यालपुढे विमाशिचे ठिय्या आंदोलन

 दै. लोकजन वृत्तसेवा सिल्ली /आंबाडी :- शिक्षण उपसंचालकांच्या वेळकाढू धोरणामुळे नागपूर विभागातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या शेकडो समस्या प्रलंबित असल्याने शिक्षकांमध्ये तीव्र असंतोषाची भावना असल्याने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वात सोमवारी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर समस्या सुटेपर्यंत ठिय्या आंदोलन पुकारले. आंदोलनाची तिव्रता लक्षात घेता शिक्षण उपसंचालक माधुरी सावरकर स्वतः आंदोलन स्थळी उपस्थित होऊन समस्या जाणून घेतल्या व सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन दिलें.

अशा आहेत समस्या:भंडारा जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि वेतन पथक अधीक्षक यांच्या नियमबाह्य व अनियमितता प्रकरणांबाबत केलेल्या तक्रारीनुसार चौकशी समिती नेमण्यात आली. मात्र, अजूनही चौकशी समितीने चौकशी केलेली नाही. दि. ७ ऑक्टोंबर २०२५ रोजी जि. प. सभागृह, नागपूर येथे पार पडलेल्या समस्या निवारण सभेत दिलेल्या आश्वासनानुसार नागपूर विभागातील प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आलेली नाही. सभेचे इतिवृत्त अद्याप दिलेले नाही. नागपूर विभागातील पवित्र पोर्टलच्या माध्यमातून रुजू झालेल्या, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती झालेल्या, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या व अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शाळा/ महाविद्यालयांमध्ये नियुक्त शिक्षक – कर्मचाऱ्यांची शालार्थ आयडी प्रकरणे प्रलंबित आहेत. पोस्ट अटॅच – डिटॅचची कार्यवाही सुद्धा प्रलंबित आहेत. कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या समस्यांबाबत समस्या निवारण सभा आयोजित करण्याबाबत चार पत्रे दिलें. मात्र, लोकप्रतिनिधींच्या दिलेल्या पत्राची कोणतीही घेतली नाही. यावेळी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, माजी आमदार व्ही. यु. डायगव्हाणे, भंडारा जिल्हाध्यक्ष सुधाकर देशमुख, कार्यवाह राजेश धुर्वे, पंजाब राठोड, अनंत जायभाये, प्राथमिकचे कार्यवाह प्रभाकर मेश्राम, राजेंद्र मेश्राम, विपीन लाखे, चंद्रशेखर राहांगडाले, अतुल लोंढे, अविनाश बडे तसेच जिल्ह्यातील समस्याग्रस्त शिक्षक व संघटनेचे पदाधिकारी ठिय्या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *