पक्षी सप्ताह; वनकर्मचाऱ्यांसाठी निरीक्षण व अध्ययन कार्यशाळा

 भंडारा : निसर्गप्रेमी आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा उपक्रम म्हणून “पक्षी सप्ताह २०२५’ अंतर्गत रविवार, ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता रावणवाडी जलाशय परिसरात पक्षी निरीक्षण व अध्ययन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा भंडारा वन विभाग आणि सेव्ह इकोसिस्टम अँड टायगर (सीट) यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच उपवनसंरक्षक योगेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. रावणवाडी येथील इंटरप्रिटेशन सेंटर आणि पर्यटन संकुल येथे पार पडलेल्या या कार्यशाळेस सहायक वनसंरक्षक सचिन निलख यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्य मार्गदर्शक म्हणून जिल्हा सारस संवर्धन समितीचे सदस्य व सीटचे सचिव शाहिद खान यांनी सारस पक्षी संवर्धनाविषयी सविस्तर माहितीदिली. त्यांनी स्थानिक परिसरातील जैवविविधतेचा अभ्यास आणि पक्षी संरक्षणासाठी वनकर्मचाऱ्यांनी घ्यावयाच्या उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *