ट्रॅक्टर उलटून चालकाचा जागेतच मृत्यू
दै. लोकजन वृत्तसेवा लाखांदूर ः- धानाचे पोते पोहोचून रिकामा ट्रॅक्टर घेवून गावाकडे जात असतांना रस्त्यावरील दगडामुळे अचानक ट्रॅक्टर उलटून चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील बोथली ते बारव्हा रस्त्यावर घडली. ही घटना आज दि. १० नोव्हेंबर सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली. उमेश धर्ममाल किरसान (वय ३५) असे मृतकाचे नाव आहे. सविस्तर असे की, लाखांदूर तालुक्यातील पारडी येथीलशेतकऱ्याचे धान मोजणी करून ट्रॅक्टर चालकाने बोथली येथ्ाील आधारभूत केंद्रावर नेले.
धानाचे पोते उपसून ट्रॅक्टर चालक खाली ट्रॅक्टर बोथली येथून पारडीकडे परत येत होता. रस्त्यावर काहीशेतकऱ्यांनी दगड काठून ठेवले होते. दरम्यान रस्त्यावरून काही मजूर महिला दगड वाचवून जात होते. दरम्यान महिलांना वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टर दगडावर आदळले व अचानक पलटले. व ट्रॅक्टर चालकाचा घटनेतच मृत्यू झाला. घटनेची माहिती दिघोरी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे ताफ्यास घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे पाठविला. पुढील तपास सुरु आहे.









