सिहोरा पोलिसांची दारू अड्ड्यावर धाड

 दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- सिहोरा पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी मोह फुलाच्या दारू अड्ड्यावर धाड टाकली असता या प्रकरणातील दोन्ही आरोपी फरार झाले असून त्यांचे विरुद्ध वेगवेगळ्या अपराध क्रमांक व कलमान्वये सिहोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून १ लाख २६ हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

ही कारवाई आज सकाळी ९ नोव्हेंबर रोजी करण्यात आली आहे. पोलीस स्टेशन सिहोराचे ठाणेदार विजय कसोधन हे आपल्या पोलीस चमू सह दावे झरी जंगल परिसरात गस्तीवर असताना या गुन्ह्यातील आरोपी राजेश सुभाष कोहळे वय ३५ वर्ष रा. दावेझरी व बबलू भदू भोयर वय ४३ वर्षे रा. दावेझरी यांनी पोलिसांना पाहून आपला पळ काढल्यामुळे पंचा समक्ष घटनेचा पंचनामा केला असता सुभाष कोहळे यांच्या दारू अड्ड्यावरून सडवा मोहफास व दारू असा ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून त्याचे विरुद्ध अ.क्र. २७४ /२०२५ कलम ६५ (फ) (ई) मदाका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर या गुन्ह्यातील दुसरा फरार आरोपी बबलू भदू भोयर यांचे दारू अड्ड्यावरून ६० हजार रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून त्यांचे विरुद्ध सुद्धा अ. क्र. २७५/२०२५ कलम ६५ (फ) (ई) मदाका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कार्यवाही पोलीस शिपाई निखिल मेश्राम व साईराम गई गये पोलीस स्टेशन सिहोरा यांचे फिर्यादी वरून करण्यात आली असून पुढील तपास पोलीस स्टेशन सिहोराचे ठाणेदार विजय कसोधन हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *