भंडारा शहरात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- विद्यानगर भंडारा येथील केतन प्रविण ठकराल यांच्या घरी सुरु असलेल्या जुगार जुगार अड्डयावर भंडारा पोलिसांनी धाड घातली. यावेळी १७ आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १० लाख ८४ हजार ५० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांना विद्यानगर भंडारा येथे केतन प्रविण ठकराल याचे राहते घरी तासपत्तीवर पैशाची बाजी लाऊन हारजीतचा खेळ खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार ठाणेदार उल्हास भुसरी यांनी पथकासह तेथे धाड घातली.
यावेळी प्रतिक किरण लेंडे (वय ३२) रा. छोटा बाजार भंडारा, नितीन रेवाराम सव्वालाखे (वय ३०) रा. शुक्रवारी भंडारा, केतन प्रविण ठकराल (वय ३८) रा. विद्यानगर भंडारा, जियाउद्दीन खुर्शीद शेख (वय २७) रा. पेट्रोलपंप ठाणा, ललीत सुरेश भोयर (वय ३२) रा. राजीव गांधी चौक भंडारा, तुषार सुरेश लांजेवार (वय ३२) रा. खातरोड भंडारा, प्रविण शंकर साकोरे (वय ३५) रा. शुक्रवारी भंडारा, राजेश नत्थुजी भुजाडे (वय ४९) रा. चांदणी चौक भंडारा, सुरेश भावराव सार्वे (वय ३६) रा. गुंजेपार, मयुर पांडुरंग सुर्यवंशी (वय २९) रा. नेहरु वार्ड भंडारा, विपीन विजय तांडेकर (वय ३६) रा. गोतम बौध्द वार्ड भंडारा, सतिश अशोक मोगरे (वय ४८) रा. कस्तुरबा गांधी वार्ड भंडारा, चंद्रशेखर सदाशिव मडामे (वय ४५)रा. सुरेवाडा पुर्नवसन, नेहाल अन्नाजी राऊत (वय २८)रा. राजेन्द्र वार्ड झोपडपट्टी भंडारा, हरीकिशन अभिमन तांडेकर (वय ३७) रा. आंबेडकर वार्ड भंडारा, कलाम हनिफ खान (वय ३८) रा. बैरागी वाडा भंडारा व कुणाल प्रमोद चुन्ने (वय ३२) रा. शुक्रवारी भंडारा हे जुगार खेळ खेळतांना मिळुन आले.
आरोपींच्या ताब्यातून नगदी ४ लाख २८ हजार ५०० रुपये,१७ मोबाईल, एक चारचाकी वाहन व दोन दुचाकी वाहन, इतर साहित्य असा एकूण १० लाख ८४ हजार ५० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस स्टेशन भंडारा येथे आरोपीतांविरुध्द कलम ४.५ म. जु. का अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधीक्षक विलास काळे यांचे मार्गदर्शनामध्ये पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांचे नेतृत्वात गुन्हे प्रकटीकरण विभागातील सहा. पोलीस निरीक्षक राजेश खांदाडे, सहा. फौजदार मोहरकर, सहा. फौजदार कुथे, हवालदार भोंगाडे, महिला पोलीस हवालदार शेंडे, नायक बंबावले, शिपाई राठोड यांनी केली.









