विजया नंदूरकर यांचा भाजपला रामराम

 पवनी : नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना जिल्हा भाजपच्या माजी सचिव डॉ. विजया नंदूरकर यांनी अचानकपणे भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा शनिवारी दिला. तुमसरात प्रदीप पडोळे यांच्या राजीनाम्याला एक दिवस लोटत नाही तोच, आता विजया नंदूरकर यांचाही राजीनामा जिल्हा आल्याने भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.

डॉ. विजया नंदूरकर मध्ये यांनी २०१६ बसपाकडून नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढविली होती. त्यामध्ये तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. त्यानंतरच्या घडामोडीत त्या भाजपमध्ये प्रवेशल्या होत्या. यावेळी भाजपकडून उमेदवारी मिळेल, याची त्यांना खात्री होती. त्यादृष्टीने त्या कामीही लागल्या होत्या; परंतु पक्षाकडून उमेदवारी मिळणार नाही, याची जाणीव झाल्याने त्यांनी तातडीने राजीनाम्याचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्या खासदार प्रफुल पटेल्ल यांच्या संपर्कात असून, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात प्रवेशसाठी मुंबईच्या वारीला गेल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *