भंडारा जिल्हा होमगार्ड कार्यालय मार्फत होमगार्डचे त्रीमासिक संमेलन साजरे
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- महासमादेशक होमगार्ड मुंबई कार्यालयातर्फे होमगार्डची अडीअडचण जाणून घेण्यासाठी प्रत्येक जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयातर्फे त्रिमासिक संमेलन करण्याबाबत आदेश देण्यात आले होते. त्यालाच अनुसरून दि. ८ नोव्हेंबर रोजी जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अप्पर पोलीस अधीक्षक भंडारा निलेश मोरे यांच्या अध्यक्षताखाली पोलीस मुख्यालय भंडारा येथे भंडारा जिल्हा होमगार्डचे त्रिमासिक संमेलन पार पडले.
कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम या राष्ट्रगीताने करण्यात आली, ज्याला सध्या १५० वर्ष पूर्ण झालेले आहे. तर संमेलनाचे प्रस्ताविक देविदास भलमे केंद्रनायक होमगार्ड भंडारा यांनी केले. अध्यक्षीय भाषणातून निलेश मोरे यांनी होमगार्डच्या अडीअडचणीकडे जातीने लक्ष देण्यात येईल व त्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्यात येतील असे आश्वस्त केले. संमेलनाच्या प्रसंगी प्रशासकीय अधिकारी शैलेश शेडमाके यांनी होमगार्ड आर्थिक संकटमध्ये राहू नये म्हणून होमगार्डचे सर्व प्रकारचे बिल काढण्यात आलेले आहे असे सांगितले. याप्रसंगी मंचावर उपस्थित साकोलीचे समावेशक अधिकारी राजेश बैस यांनी होमगार्ड ने शिस्तीला महत्त्व दिले पाहिजे असे सांगितले.
याप्रसंगी मंचावर उपस्थित श्रीमती लक्ष्मी उईके हे कनिष्ठ लिपिक पदावर नियुक्त झाल्यावर जिल्हा समादेशक होमगार्ड भंडारा तर्फे त्यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस प्रशिक्षण केंद्र अकोला येथे होमगार्डच्या प्रशिक्षणात उत्तम वार्डन म्हणून कार्य केल्यावर भगवान देशमुख समादेशक अधिकारी अड्याळ यांना स्मृतीचिन्ह देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिजवान रशीद खान पठाण पलटण नायक यांनी केले तर आभार प्रदर्शन महेंद्र नंदेश्वर समादेशक अधिकारी भंडारा यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता वाणी समादेशक अधिकारी पवनी, भाजीपाले पलटण नायक, गभणे समादेशक अधिकारी मोहाडी, वैद्य पलटणनायक, मधु थोटे वरिष्ठ पलटणनायक, मस्के पलटण नायक, टेंबरे समादेशक अधिकारी तुमसर, शहारे पलटणनायक, दिवटे सार्जंट यांनी अथक प्रयत्न केले.









