बारा करोडचा सिमेंट रस्ता किती वर्ष टिकेल
दै. लोकजन वृत्तसेवा करडी /पालोरा :- मोहाडी तालुक्यातील बोरगाव ते पालोरा ते जांभोरा ते किसनपुर ते करडी फाट्याप्रर्यंत बारा करोड रुपयाचा सिमेंट काँक्रीट रस्ता मंजूर करण्यात आला कामाला प्रत्यक्षात सुरूवात करण्यात आली आहे. पालोरा ते जांभोरा हा दोन किलोमीटरचा रस्ता साडेपाच मीटर रूंदीचा होत आहे. त्याअगोदर तीन मीटर रूंदीचा डांबरीकरण रस्ता आहे तो पण अनेक ठिकाणी उखडलेला आहे.
त्यामुळे प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत होती. अनेक वर्षापासून हा रस्ता नव्याने तयार व्हावा यासाठी आंदोलने करण्यात आली निवेदने देण्यात आली मात्र रस्ता मंजूर होत नव्हता. त्यामुळे तुमसर मोहाडी विधानसभा श्रेत्राचे आमदार राजूभाऊ कारेमोरे यांनी पुढाकाराने रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेमधून मंजूर करण्यात आला. त्यासाठी१२ करोड रुपये ९ किलोमीटर बोरगाव ते पालोरा ते जांभोरा ते किसनपुर ते करडी फाट्याप्रर्यंत सिमेंट रस्ता मंजूर झाला. भुमीपुजन झाले आणी कामाला सुरुवात करण्यात आली.
अंदाज पत्रकानुसार रस्त्याच्या बाजुची साफसफाई करणे रस्त्याचे सोलडर भरणे, सात मीटर रस्ता खोदून त्याठिकाणी आठ इंच मुरूम, सहा इंच जी एस बी चार इंच गिट्टी वर दोन इंच मुरूम टाकून दबाई करणे अंदाज पत्रकात समाविष्ट असल्यावरही काम अंदाज पत्रकानुसार होत नसल्याने काम किती वर्ष टिकेल हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जांभोरा टोला पासून कामाला सुरुवात करण्यात आली त्यामध्ये चार इंच डी एल सी टाकणे अपेक्षित असतांनी फक्त दोन ते तीन इंच डी एल सी टाकण्यात येते. त्या डी एल सी मध्ये सिमेंट नाहीच्या बरोबर वापर होत आहे तर डस्ट चा वापर जास्त प्रमाणात आहे. याबाबत संबधित विभागाच्या अधिकारी यांना माहिती देण्यात आली. त्यानुसार प्रत्यक्षात अधिकारी यांनी काम बघितले तर कामाची गुणवत्ता ढसाळ दिसून आली.
चार इंच डी एल सी टाकण्यात येत नसल्याने अधिकारी यांनी कामात सुधारणा करण्यास सांगितले. मात्र कामात सुधारणा न करता आपल्याच मनमर्जी ने काम कंत्राटदार करत असल्याने कामाचा दर्जा सुधारला गेला नाही. त्यामुळे हा सिमेंट रस्ता किती वर्ष टिकेल हे सांगताचयेत नाही. वरचा कोड सहा इंच व्हेरींग कोड चा आहे. मात्र तो शुध्दा अंदाज पत्रकानुसार होणार नाही हे निश्चित . जांभोरा ते पालोरा हा दोन किलोमीटरचा रस्तामध्ये रस्त्याच्या कडेला दोन दोन मीटर खोदून त्याठिकाणी मुरूम, जी एस बी व गिट्टी आणि वरुन मुरूम टाकून पाण्याचे वापर करून दबाई करणे आवश्यक असतांनी कंत्राटदार याने दोन मीटर रस्ता खोदला. पण जेवढे खोदकाम करायचे होते तेवढा न खोदता फक्त जी एस बी टाकण्यापुरता खोदून काम केले. मुरूम न टाकल्याने रस्ता रस्ता पोकळ राहणार आहे. त्यामुळे रस्ता लवकरच खराब होणार आहे हे निश्चित रस्ता कालावधीच्या अगोदर खराब झाल्यास संबंधित उप अभियंता यांच्या कडून रस्त्यावर झालेल्या खर्चाची वसुली करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.









