मोहाडी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा
दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- सततच्या येणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील धान पीक जमीनदोस्त झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला त्यामुळे मोहाडी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा असे निवेदन मोहाडी तालुका राष्ट्रवादी कांग्रेस च्या माध्यमातून तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले. जीवाचे रान करून शेतकरी शेती पिकवीतो. असा एकही वर्ष लोटला नाही की शेतकऱ्यांने शेतीतील फसल परिपूर्ण घरापर्यंत आणली. त्याला प्रत्येकच वर्षी संघर्ष करून कसेबसे शेत पिकवावे लागते.
यावर्षी सुद्धा मागील २० दिवसांपासून सततधार अवकाळी पाऊस कोसळला. त्यामुळे धानपीक पाण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट होणार हे निश्चित आहे.मागील काही दिवसांपासून मोहाडी तालुक्यात झालेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात शेतपिकाचे नुकसान झाले आहे. खरीप हंगामातील पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदिल झाला असून उदरनिर्वाह करायचा कसा असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. शेतकऱ्यांची व्यथा लक्षात घेता मोहाडी तालुका राष्ट्रवादी कांग्रेस संघटनेने तर्फे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यान्हा निवेदन देऊन मोहाडी तालुका ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे.
मोहाडी तालुक्यात शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट स्वरूपाची झाली आहे. पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी आत्मनिर्भर होण्याऐवजी आत्महत्या करावी या विचारात जात आहे. अशावेळी शासनाने संवेदनशीलतेने तातडीने निर्णय घेऊन मदतीचे पॅकिंग तात्काळ जाहीर केले पाहिजे. सध्या तालुक्यातील शेतकऱ्यांचे हलक्या स्वरूपाचे धानपिक कापणीला आले असूनशेतात साचलेल्या पावसामुळे धान कापणीला उशीर होत आहे.
धानाच्या लोंबा गळत असल्याने नुकसानीचे सावट शेतकऱ्यांवर पसरत आहे. भारी स्वरूपाचे धान गर्भात आले असून झालेल्या पावसामुळे काही धानपिक शेतात लोटले आहेत. त्यामुळे लोटलेल्या धानाला सरळ करण्यासाठी शेतकऱ्यांना बरीच कसरत करावी लागणार असून याचाआर्थिक भुदंड शेतकऱ्यांवर बसणार आहे. शेतकऱ्याने पाई पाई जमा करून शेती कसली. परंतु संततधार पावसामुळे शेतकऱ्यांवर पूर्ण कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. करिता शासनाने शेतकऱ्यांची व्यथा लक्षात घेता तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा असे निवेदन सरपंच संघटनेच्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.
निवेदन देताना मोहाडी तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अध्यक्ष सदाशिव ढेंगे, आनंद मलेवार सभापती जिल्हापरिषद भंडारा, जगदीश शेंडे सभापती पंचायत समिती मोहाडी, देवा चकोले उपसभापती पंचायत समिती मोहाडी, महादेव पचघरे जिल्हापरिषद सदस्य, सुभाष गायधणे जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, पवन चव्हाण शहर अध्यक्ष मोहाडी, रोहित बुरडे युवक अध्यक्ष मोहाडी तालुका, हैशोक शरनगात जिल्हापरिषद सर्कल प्रमुख, आशा बोन्द्रे पंचायत समिती सदस्य, सीमा रहांगडाले माजी सरपंच पाचगाव, लीलाधर कांबळे सरपंच नीलज, चंद्रकांत पुंडे उपसरपंच, कैलास तितीरमारे पंचायत समिती सर्कल प्रमुख, छोटूलाल मीरासे पंचायत समिती सर्कल प्रमुख, सुरजलाल शरणागते, सतीश बोन्द्रे, गणेश निपाने, किशोर अतकरी, मीनल शेख, व अन्य पदाधिकारी यांची उपस्थिती होती.









