राज्यातील नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांच्या तारखा जाहीर; निवडणूक आयोगाचे १० महत्त्वाचे मुद्दे

मुंबई:- राज्यात गेल्या ४ वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर आज ४ नोव्हेंबर रोजी वाजला. त्यानुसार, राज्यात २ डिसेंबरला मतदान होणार असून ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे, राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी याबाबतची घोषणा केली. त्यामुळे पुढील १ महिन्यात नगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम संपुष्टात येणार असल्याचे दिसून येते. १० नोव्हेंबरपासून उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून १७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज दाखल करावा लागणार आहे. त्यामुळे, राजकीय पक्षांना पुढील ८ दिवसांत उमेदवारांची नावे निश्चित करावी लागणार आहेत. दरम्यान, ४ नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आलीआहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *