१००१ व्या सुंदरकांड सोबतच १९ वा वार्षिक महोत्सव साजरा

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- श्रीराम मित्र मंडळ भंडाराच्यावतीने १००१ वा शनिवारीय सुंदरकांड तसेच १९ वा वार्षिक महोत्सवाचे ऐतिहासिक आयोजन दि. १ नोव्हेंबर रोजी संभाजी लॉन, मेन रोड भंडारा येथे भक्ती, श्रद्धा व सामुहिकतेच्या दर्शनात, भक्तिमय वातावरणात पार पडले.

यात भंडारा शहरातील असंख्य भाविकांनी भाग घेतला, हे विशेष. शनिवारीय सुंदरकांडच्या १९ व्या वार्षिक महोत्सवाचे यजमान विनयसिंह सोळंकी व सुधीर मोहबे यांच्यावतीने पुजा अर्चना करण्यात आली. प्रथम मंगलाचरणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सर्वप्रथम श्रीरामचरितमानस ने सुंदरकांडची सुरुवात करण्यात आली. सदस्यांनी संगीतमय दोहे म्हटले. यानंतर सामूहिक हनुमान चालिसाने वातावरण राममय झाले.

श्रीराम मित्र मंडळाचे सदस्य धनंजय खंडेरा यांनी मंडळाची १९ वर्षाची यात्रा, केलेले सामुहिककार्य याचा अहवाल वाचन केला. त्यानंतर मंडळाचे संस्थापक सदस्य यांचे अभिनंदन व स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात सहभागी नवीन सदस्यांचे सुद्धा स्वागत करून श्रीराम मित्र मंडळाच्या गौरवशाली परीवाराचा अंग बनण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या संस्मरणीय कार्यक्रमाची आठवण म्हणून प्रत्येक सदस्यांना भक्ती परंपरा व संघटनेची एकतेचा प्रतिक असलेला मोमेंटो देण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटच्या चरणात प्रभु श्रीराम, श्री हनुमानव खाटू श्याम यांच्या जन्मदिवसानिमित्त मनोहर भजन संध्या चे आयोजन करण्यात आले. अतिशय मंगलमय व भक्तिमय वातावरणाने भाविक मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाचा शेवट महाप्रसाद व सामुहिक स्नेह भोजनाने झाला. संपूर्ण कार्यक्रमात अनुशासन, श्रद्धा व संघटनची भावनेचा संगम दिसून आला. श्रीराम मित्र मंडळाच्यावतीने १९ वर्षापासून सुरु असलेली परंपरा समाजासाठी प्रेरणास्त्रोत बनली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *