सेंदूरवाफा येथे आज कार्तिक पौर्णिमेनिमित्त भव्य रथयात्रा
राकेश बैस भंडारा (दै. लोकजन):- जवळपास ८० वर्षांपूर्वी सेंदूरवाफा येथील तत्कालीन प्रसिद्ध संत तथा विठ्ठल भक्त सीताराम महाराज यांनी या यात्रेची सुरुवात केली होती. तेव्हापासून ही यात्रा सतत व निरंतर चालू असून कोरोना काळात सुद्धा फक्त मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत ही यात्रा आयोजित करण्यात आली होती, हे विशेष. सेंदूरवाफा येतील प्रसिद्ध विठ्ठल भक्त तथा संत सीताराम महाराज उर्फ सिताराम बाबा यांनी ही यात्रा कार्तिक पौर्णिमेचे औचित्य साधून सुरू केली होती.
त्या काळात प्रत्येक विठ्ठल भक्ताला कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पंढरपूर येथे जाणे शक्य नव्हते. त्यामुळे सिताराम महाराज यांनी स्वयं गावी म्हणजे सेंदूरवाफा येथे या यात्रेची सुरुवात केली. नंतर कालांतराने या यात्रेचे स्वरूप बदलत गेले व आजच्या घडीला ही यात्रा अत्यंत आधुनिक व परंपरागत अशा दोन्हीही संस्कृतीचे दर्शन या यात्रेत भाविकांना घडत असते.
सेंदूरवाफा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराची देखभाल आजच्या घडीला विठ्ठल रुक्मिणी मंदिराची संचालिका सिताराम महाराज यांची मुलगी एकादशी लांजेवार व सीताराम महाराज यांचे नातू घनश्याम लांजेवार हे सांभाळतात व वर्षभर सिताराम महाराजांची मुलगी व नातू या मंदिराची देखभाल करतात सेंदूरवाफा येथील कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित या यात्रेमध्ये यावर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या असून यात भजन स्पर्धा त्यातही पुरुष गट व महिला गट असे दोन वेगळ्या गटात भजन स्पर्धा आयोजित केली असून या भजन स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गायक ,उत्कृष्ट गायिका, उत्कृष्ट पेटी मास्तर, उत्कृष्ट तबलावादक, उत्कृष्ट खंजरी वादक असे वेगवेगळे पुरस्कार ठेवले असून भजन स्पर्धेत प्रथम येणाऱ्या गटाला प्रथम द्वितीय व तृतीय असे तीन पुरस्कार सुद्धा देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे
या यात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे गेट स्पर्धा या स्पर्धेत रथ यात्रेच्या भ्रमण मार्गात ठिकठिकाणी या रथाच्या स्वागताकरिता सुशोभित व शोभिवंत गेट उभारण्यात येतात या प्रवेश द्वाराच्या उत्कृष्ट सजावटी करिता अ गट ब गट व क गटअसे प्रत्येक गटात दोन-दोन पारितोषिक रथ यात्रा समितीच्या वतीने दरवर्षी देण्यात येतात याकरिता रथयात्रेच्या भ्रमण मार्गात लावलेले प्रवेशद्वाराची सजावट ज्या गेटची उत्कृष्ट उत्कृष्ट सजावट शोभिवंत तथा रोषनाईने तसेच प्रवेशद्वारा जवळ रंगबिरंगी रांगोळ्या यांनी सजविलेले
प्रवेशद्वार यावेळेस या यात्रेत येणाऱ्या प्रत्येक यात्रेकरूंचे व भाविकांचे मनमोहन घेतात. या यात्रेत सेंदूरवाफा गावच्या हद्दीमध्ये आजच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे मास मटन मच्छी काटण्यास व खाण्यासप्रतिबंध असून स्थानिक नागरिक स्वयंप्रेरणेने मांसाहार करण्याचे टाळतात. त्यामुळे ही यात्रा स्थानिक नागरिकांसाठी धार्मिक ते सोबतच भावनिक तेचे उदाहरण आहे. आजच्या दिवशी मांसाहार विकणारे दुकानदार सुद्धा आपापले दुकान स्वयंप्रेरणेने बंद ठेवतात हे या यात्रेचे अजून एक खास वैशिष्ट्य आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी मनोरंजनाच्या दृष्टीने चार-पाच ठिकाणी मनोरंजनाचे कार्यक्रम सुद्धा स्थानिक नागरिकांनी आयोजित केले आहे. या यात्रेत आयोजित भजन स्पर्धेचे उद्घाटन रात्री साडेदहा वाजता होणार असून या कार्यक्रमात गोंदिया भंडारा जिल्ह्याचे खासदार प्रशांत पडोळे,









