“धन गुरु नानक सारा जग तारे’ च्या जयघोषाने दुमदुमली साकोली नगरी

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- श्री गुरू नानक यांच्या जयंतीनिमित्त, २८ सप्टेंबरपासून लाखांदूर रोडवरील सिंधू भवन येथे “अमृतवेला चालिया’ म्हणून साजरा केला जातो. रविवार २ नोव्हेंबर रोजी सकाळच्या कथेनंतर अमर जगिया, चंद्रभान मल्लानी, अनिल खटवानी, डॉ. दीपक चंदवानी, मुकेश जगिया, अजित मल्लानी, तीरथदास चांदवानी आदींच्या नेतृत्वात प्रभातफेरी सर्व्हिस रोड मार्गे सिंधू भवन येथे परतली. या प्रभातफेरीत शहर “धन गुरु नानक सारा जग तारे’ च्या जयघोषाने दुमदुमले. रविवार २ नोव्हेंबर रोजी सिंधूभवन येथून सुरू झालेल्या प्रभातफेरीचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. प्रभात फेरी ज्या भागातून निघाली तो भाग पाणी आणि फुलांनी शुद्ध करण्यात येत असून सर्व भाविकांना प्रसादाचे वाटपही करण्यात आले.

पूज्य सिंधी पंचायतीचे अध्यक्ष अशोक जगिया, उपाध्यक्ष डॉ. राजेश चांदवानी यांच्या मार्गदर्शनाखाली नवयुवक सेवा मंडळाचे सदस्य व अमृतवेला ट्रस्ट यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत. श्रीचंद मंझानी, अमर पोपटानी, प्रकाश मुलवानी, अमित जगिया, सुजित मल्लानी, शिवम मल्लानी, किशोर हरजानी, नरेश गिदलानी, सुनील पोपटानी, मीना तनवाणी, ज्योती मुलवानी, कमला पोपटानी, सपना मल्लानी, हिमांशी चंदवाणी, कांचन मल्लानी, चंदवानी, दीपकुमारमल्लानी, दीपकुमार मल्लानी, डी. गिदलानी, अनिता गिदलानी, संगीता गिदलानी, कविता जगिया, सरिता जगिया, साक्षी जगिया, कांचन सोडेजा, भारती चुघ, मुस्कान चुघ, आरती जगिया, एकता जगिया, आदी प्रयत्न करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *