शासनाने सरसकट शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी – अविनाश ब्राह्मणकर

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- भंडारा जिल्ह्यात मागील चार दिवस झालेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात कापून ठेवलेला धान पूर्णतः खराब झाला असून शेतातच धनाला आता अंकुर फुटायला लागल्यामुळे शेतकरी खूपच चिंतातून झाला असल्यामुळे शासनाने तात्काळ सरसकट व भरीव मदत शेतकऱ्यांना देण्याची मागणी भंडारा जिल्हा किसान आघाडीचे अध्यक्ष तथा जी. प. सदस्य अविनाश ब्राह्मणकर यांनी एका निवेदनातून शिष्टमंडळासहित दिलेल्या निवेदनातून मागणी केली आहे.

भंडारा जिल्ह्यात दि. २६ ते ३० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आलेल्या अवकाळी पावसामुळे झालेले नुकसानीसाठी सर्व शेतकरी बांधवांना सरसकट भरीव मदत मिळावी अशा मागणीचे निवेदनभारतीय जनता पार्टी किसान मोर्चा आघाडीचे जिल्हाध्यक्ष जि. प. सदस्य अविनाश ब्राम्हणकर यांच्या नेतृत्वात साकोली येथील तहसिलदार यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना सोपविण्यात आले.

भंडारा जिल्ह्यातील साकोली, लाखनी व लाखांदूर या तालुक्यांमध्ये सर्वत्र दि. २६ ते ३० ऑक्टोबर २०२५ याकालावधीत आलेल्या ढगफुटी सदृस्य अवकाळी पावसामुळे सर्व शेतकरी बांधवांवर गंभीर संकट ओढावले आहे. ऐन कापणीच्या हंगामात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात कापून ठेवलेल्या व पडलेल्या धान पिकाला कोंब फुटण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अपरिमित आर्थिक नुकसान झालेले असून बळीराजा हवादिल झालेला आहे. किसान मोर्चा आघाडी (भाजपा) भंडारा जिल्ह्याच्या वतीने देशामध्ये गतीमान असलेल्या महाराष्ट्र शासनाकडे आपल्या ल्या भागातील शेतकरी बांधवाना भरीव मदत तात्काळ मिळणे आवश्यक असल्याचे लक्षात आणून देत आहे.महाराष्ट्र शासना तर्फे भरीव मदत न मिळल्यास शेतकरी बांधवाना फार मोठ्या त्रासाला व नुकसानीला सामोरे जावे लागेल. त्यामुळे शेतकऱ्यांची आत्महत्या होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भंडारा जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी सर्व शेतकरी बांधवांना महाराष्ट्र शासनातर्फे सरसकट भरीव मदत तात्काळ देण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष अविनाश ब्राम्हणकर, महिला आघाडी अध्यक्ष माहेश्वरी नेवारे, जि. प. सदस्या वनिता डोये, माजी नगरसेवक रवि परशुरामकर, मनिष कापगते, गीता बोरकर, देवश्री कापगते, मारोती बोरकर, प्रदीप गोमासे, प्रिती डोंगरवार आदी कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *