शेतकऱ्यांच्या अधिकाधिक मदतीसाठी आम्ही प्रयत्नशील
भंडारा :- धान उत्पादकांच्या अडचणीची आणि झालेल्या नुकसानीची जाण आम्हाला आहे. असे प्रतिपादन पालकमंत्रा पंकज भ्ाोयर यांनी केले. पक्षीय कार्यक्रमासाठी शनिवारी झालेल्या भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान पालकमंत्री पंकज भोयर यांनी पवनी तालुक्यातील पालोरा चौरास परिसरातील शेतशिवारात नासाडी झालेल्या धान पिकाची पहाणी केली.
या दरम्यान त्यांनी चोखपणे सर्वे करण्याचे आदेशही स्थानिक यंत्रणेला दिले. पवनी येथील पक्षाच्या मेळाव्यानंतर भंडाराकडे परत येताना पालकमंत्री भोयर यांनी शेताच्या बांधावर जाऊन पहाणी केली.यावेळी आ. परिणय फुके, भाजप जिल्हाध्यक्ष आशु गोंडाणे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील नुकसानग्रस्त मदत शेतकऱ्यांना अधिकाधिक करण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. उपस्थित असलेले तलाठी, कृषी अधिकारी आणि महसूल विभागातील अधिकाऱ्यांना सर्वे योग्यपणे व टाळाटाळ न करता व्हावा, अशा सूचना केल्या.







